माणुसकीला काळीमा! खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 11:12 IST2021-07-17T11:10:01+5:302021-07-17T11:12:22+5:30

Pune Crime News : हॉटेल मालकाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या दोघांना हॉटेल मालक व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली.

Two killed in beating at Karanjvihire in Khed taluka Pune | माणुसकीला काळीमा! खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू

माणुसकीला काळीमा! खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू

चाकण - खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविहिरे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हॉटेल मालकाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या दोघांना हॉटेल मालक व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे. बाळू सिताराम गावडे, राहुल दत्तात्रय गावडे असे मारहाणीत मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, करंजविहिरे परिसरात हॉटेल माणुसकीचे मालक बाळू मरगज यांचे हॉटेल आहे. तसेच त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय देखील आहे.मात्र विटभट्टीवर काम करणारा कामगार आणि हॉटेल मालक यांची मुलीला कामगार असलेल्या मुलगा बाळू सिताराम गावडे, राहुल दत्तात्रय गावडे या दोघांनी हॉटेल मालकाच्या मुलीला पळून नेले होते.

मात्र हॉटेल मालकांनी बाळू, राहुल आणि त्यांची मुलगी यांना बोलावून घेतले. आणि लोखंडी रॉड, काठी यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये राहुल दत्तात्रय गावडे ( वय.२८ वर्षे रा.आसखेड खुर्द ) बाळू सिताराम गावडे ( वय.२६ वर्षे, राहणार आसखेड खुर्द ) यांचा या मारहाणीत जागेवरच मृत्यू झाला आहे.यांना मारहाण करणारे अनिल संभाजी कडाळे,राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ,चंद्रकरा उर्फ मुक्ता बाळू गावडे,आनंदा सीताराम जाधव ( रा. करंजविहीरे )बाळू मरगज हॉटेल मालक यांना सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Two killed in beating at Karanjvihire in Khed taluka Pune