कल्याणीनगर येथे अपघातात दोघांचा मृत्यू ,युवती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 15:30 IST2018-12-26T15:29:33+5:302018-12-26T15:30:47+5:30
मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ब्रम्हा सनसिटी, वडगावशेरी, आदर्शनगरकडून डिओ दुचाकीवरुन दोन तरुण व एक तरुणी कल्याणीनगरकडे चालले होते.

कल्याणीनगर येथे अपघातात दोघांचा मृत्यू ,युवती जखमी
पुणे (विमाननगर) : डिओ दुचाकीला ब्रिझाकारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा म्रृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असणारी युवती गंभीर जखमी झाली.मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या गंभीर अपघातात एरीक जोसेफ राँड्रिक्स (वय २५, मोझेसवाडी, वडगावशेरी) व अमेय रविशेखर आखारे (२५, वाघेश्वरनगर, वाघोली) या दोघांचा उपचारापूर्वीच म्रृत्यू झाला तर शँनियन कोलन(वय २१,रा.गणेशनगर दापोडी) ही गंभीर जखमी झाली. याप्रकरणी अपघात करणाऱ्या अज्ञात कारचालकाविरुध्द येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वडगावशेरी आदर्शनगरकडून डिओ दुचाकीवरुन दोन तरुण व एक तरुणी कल्याणीनगर कडे चालले होते. समोरुन वेगात आलेल्या लाल रंगाच्या ब्रिझा कारने दिलेल्या जोरदार धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले.स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच दोन्ही तरुणांचा म्रृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषित केले. तर सोबत असणारी युवती गंभीर जखमी झाली.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अदयात कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे करीत आहेत.