शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक वादातून पार्टनरचे मुंडके छाटले, टॅटूमुळे ओळख पटली; १२ तासांत थरारक हत्याकांड उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:10 IST

मृताच्या उजव्या हातावर 'अशोक सिंह' असे नाव आणि बदामाचे चिन्ह गोंदलेले होते. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता

मंगेश कराळे

नालासोपारा - डॉग स्कॉड आणि मयताच्या हातावरील टॅटूमुळे मयताची ओळख पटवून दोन आरोपींना अटक करण्यात आली. मुंडके नसलेल्या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पेल्हार पोलिसांना १२ तासांत यश मिळाले आहे. हत्या करून फेकलेले मुंडके व मोबाईल खानिवडे खाडीतून पोलिसांनी हस्तगत केले आहे. दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेपाडा येथील पाटील कुटुंबीयांच्या आंब्याच्या वाडीत काही तरुणांना झुडपांमध्ये एक संशयास्पद गोणी आढळून आली होती. या गोणीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तत्काळ पेल्हार पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोणी उघडून पाहिली असता, त्यात एका पुरुषाचे मुंडके नसलेले धड आढळून आले होते. मृतदेहाचे मुंडके नसल्याने मृताची ओळख पटवणे हे पेल्हार पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. मृताच्या उजव्या हातावर 'अशोक सिंह' असे नाव आणि बदामाचे चिन्ह गोंदलेले होते. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पेल्हार पोलिसांनी दिले होते.

पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अंमलदार यांनी तब्बल १२ तास काहीही न खातापीता अथक प्रयत्न करुन १०० ते १५० सीसीटीव्ही तपासून संशयित वाहनांचा शोध घेतला. तसेच ठाण्यावरून आलेले डॉग स्कॉड जाबरपाडा दिशेने गेले आणि पोलिसांना तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी माहिती प्राप्त करुन तपासाचे आधारे संशयीत दिनेशकुमार कानाराम प्रजापती (२७) याला पेल्हार गाव जाबरपाडा परिसरातून शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करून त्याचा मित्र संदिप ब्रम्हदेव तिवारी (२५) याला ताब्यात घेतले. या दोघांनी मिळून त्यांचा मित्र मयत अशोक सिंग करम सिंग राजपुत (३२) याला जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. आरोपी दिनेशकुमार आणि मयत अशोक सिंग यांच्यामध्ये भागीदारीत किराणा माल विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसायातील आर्थिक वादातून आरोपींनी अशोक सिंहला धारदार हत्याराने त्याचे शीर कापून त्याचे शरीरावर अनेक वार करुन जीवे ठार मारले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मागदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी पाटील, पोलीस निरीक्षक शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि रमेश वाघचौरे, पोउपनि तुकाराम भोपळे, सफौ योगेश देशमुख, पोहवा तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, अभिजीत नेवारे, नामदेव ढोणे, अशोक परजने, वसिम शेख, अनिल वाघमारे, अमोल मस्से, निखील घोरपडे, सोहेल शेख यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Partner beheaded over financial dispute, tattoo leads to arrest.

Web Summary : Nalasopara: A man was beheaded due to a financial dispute. Police solved the murder within 12 hours by identifying a tattoo. Two accused are arrested; head recovered from creek.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी