महामार्गावर थरार; खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच आरोपीवर गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:14 PM2021-09-21T21:14:13+5:302021-09-21T21:16:59+5:30

Murder Case : मुलगा ठार, पिता जखमी

Tremors on the highway; Accused shot dead after being released on bail for murder | महामार्गावर थरार; खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच आरोपीवर गोळीबार 

महामार्गावर थरार; खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच आरोपीवर गोळीबार 

Next
ठळक मुद्देमंगळवारी सायंकाळी सात वाजता नशिराबाद महामार्गावर सुनसगाव पुलानजीक ही घटना घडली. त्या गुन्ह्यात पाच जणांना आरोपी करण्यात आले होते. हा खून धम्मप्रिया याने केल्याचा आरोप होता.

जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटताच धम्मप्रिया मनोहर सुरडकर (वय १९,) याच्यावर गोळीबार झाला असून त्यात तो जागीच ठार झाला तर धम्मप्रियाचे वडील मनोहर आत्माराम सुरडकर (वय ४५,रा.पंचशील नगर, भुसावळ)गंभीर जखमी झाले आहेत. समीर शेख जाकीर व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी गोळीबार व चाकूने वार केल्याची माहिती जखमी मनोहर सुरडकर यांनी ‘लोकमत’ दिली. मंगळवारी सायंकाळी सात वाजता नशिराबाद महामार्गावर सुनसगाव पुलानजीक ही घटना घडली. 


याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाचा पंचशील नगरात खून झाला होता. त्या गुन्ह्यात पाच जणांना आरोपी करण्यात आले होते. हा खून धम्मप्रिया याने केल्याचा आरोप होता. मंगळवारी तो जामीनावर कारागृहातून बाहेर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कैफचा भाऊ समीर, रेहान व आणखी एक असे तीन जण त्याच्यावर दबा धरुन होते. धम्मप्रिया व त्याचे वडील दोघं जण दुचाकीने घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ अचानक आलेल्या तिघांनी मिरची पूड डोळ्यात टाकली आणि धम्मप्रियावर गोळीबार केला तर मनोहर यांच्यावर चाकूने वार केले. यात धम्मप्रिया जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,भुसावळचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मृत पिता-पूत्रांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. ही घटना म्हणजे ‘खून का बदला खून’अशीच आहे.
 

Web Title: Tremors on the highway; Accused shot dead after being released on bail for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.