नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:34 PM2022-01-13T21:34:38+5:302022-01-13T21:35:05+5:30

Gangrape Case :ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील  मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली.

Tied relative hand and legs, gang-raped married woman in forest | नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक

नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक

Next

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे एका विवाहितेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींपैकी दोघांना अटक केली असून तिसर्‍याचा शोध सुरू आहे. ही घटना उघडकीस येताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डीआयजी, एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह आणि इतर अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पीडितेची चौकशी केली. यासोबतच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले.

ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील  मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली. पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, तरुणांनी आधी तिच्या नातेवाईकाला मारहाण केली आणि हात पाय बांधले. त्यानंतर तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. तिसर्‍याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत.

अज्ञात मृतदेहामुळे लागला दुसऱ्या रहस्यमयी खुनाचा तपास, पतीला ठोकल्या बेड्या

गुप्तांगावर धारदार शस्त्राने प्रहार; गँगरेप झालेल्या युवतीचे ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले


नातेवाईकाचे हात-पाय बांधून मग सामूहिक बलात्कार

याप्रकरणी एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह सांगतात की, घोरवल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलातून एक विवाहित महिला आपल्या नातेवाईकासोबत मोटरसायकलवरून घरी जात होती. तेव्हा एका निर्जनस्थळी त्यांना पाहून तिघांनी अडवले. तिघांनीही महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकाने विरोध केला. त्यानंतर तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण करून हात पाय बांधले. त्यानंतर जंगलात नेऊन महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

Web Title: Tied relative hand and legs, gang-raped married woman in forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.