दुर्गापूर : पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रविवारी तिघांना अटक करत एका संशयिताला ताब्यात घेतले. या तिघांना उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. शुक्रवारी रात्री महाविद्यालयाच्या परिसराबाहेर विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. पीडितेवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे येथील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस व विरोधी पक्षांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
अत्याचाराला बळी पडलेली पीडित विद्यार्थिनी ही ओडिशा राज्यातील रहिवासी आहे. त्यामुळे ओडिशा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष शोभना मोहंती यांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
मुलीची सुरक्षितता धोक्यातपश्चिम बंगालमध्ये माझ्या मुलीची सुरक्षितता धोक्यात असल्याचा दावा पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला आहे. मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. मुलीला चालता येत नसून ती बेडरेस्टवर असल्याचे नमूद करत वडिलांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.
दुर्गापूर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप, काँग्रेस व माकपने रविवारी पश्चिम बंगालमध्ये विविध भागात निदर्शने करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
दुर्गापूर येथील सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत धक्कादायक आहे. असे गुन्हे करणाऱ्या आरोपींबद्दल आमच्या सरकारचे कठोर धोरण राबवले. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री
Web Summary : Three arrested, one detained in West Bengal medical college gang rape. Victim is from Odisha. Political unrest and protests erupt, demanding justice.
Web Summary : पश्चिम बंगाल मेडिकल कॉलेज सामूहिक बलात्कार मामले में तीन गिरफ्तार, एक हिरासत में। पीड़िता ओडिशा से है। राजनीतिक अशांति और न्याय की मांग को लेकर विरोध प्रदर्शन।