शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 20:08 IST

Deputy CM Eknath Shinde: कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला कोकणात सापडला आहे हिरा, तो म्हणजे निलेश राणे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे करेगा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Deputy CM Eknath Shinde: कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला कोकणात सापडला आहे हिरा. पोटात एक ओठात एक मला जमत नाही. जो काम करतो त्याच्या पाठिशी उभे राहणारा एकनाथ शिंदे आहे. निलेश राणे केव्हा घाबरत नाही. नारायण राणे यांचे बाळकडू त्याला मिळाले आहे. एकनाथ शिंदे डॉक्टर नसला तरी अनेक ऑपरेशन केली आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत निलेश राणे आला आहे. मालवणचे भविष्य सुधारण्यासाठी निलेश राणे धावून येतो. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे करेगा, कुणी कितीही करा कल्ला मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पराभव दिसू लागला की, अनेकांचे दशावतार सुरू होतात. सगळीकडे लाडक्या बहिणीची उपस्थिती जास्त आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कार्यकर्ता म्हणून काम केले. अनेक योजना आणल्या. आम्ही टीम म्हणून काम करून ही योजना सुरू केली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोकणी माणूस फणसासारखा बाहेरुन काटेरी, आतून गोड

कोकणी माणूस फणसासारखा बाहेरुन काटेरी आणि आतून गोड. म्हणून शिवसेनेची कर्मभूमी आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वात नारायण राणे मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प आले. पुढचे भवितव्य समोर ठेऊन काम करायचे आहे. मी जे बोलले तो करतो. जे होणार नाही ते बोलत नाही. दिलेला शब्द पाळणार आहे. उदय सामंत यांना अनेक सभेत फोन करून उद्योग मंत्री म्हणून उद्योग वाढवण्याचे काम करण्यासाठी फोन केले. मालवणचा कायापालट करू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरम्यान, लाडक्या बहिणीसाठी आणि भावांसाठी रक्ताचा थेंब असेपर्यंत काम करेन. मला निलेश राणे यांचे कौतुक वाटते. तुमच्याकडे निलेश राणे यांच्यासारखे आमदार आहेत. निलेश राणे पक्षासाठी, आपल्या मतदारांसाठी जीवाच रान करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. एकनाथ शिंदे दोन्ही हातांनी देणारा आहे. शासन आपल्या दारी योजनेचा ४ कोटी लोकांना फायदा झाला, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Malvan is Shiv Sena's Fortress, No Matter the Noise: Shinde

Web Summary : Eknath Shinde praised Nilesh Rane, emphasizing his dedication and courage. Shinde highlighted Rane's commitment to Malvan's development and affirmed Shiv Sena's stronghold in the region. He also mentioned various government initiatives benefiting the people.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेNilesh Raneनिलेश राणे Shiv Senaशिवसेना