Local Body Election 2025 Maharashtra: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचू लागला असून, आता वादग्रस्त विधान अन् वार-पलटवारांनी राजकीय मैदान गाजू लागले आहे. नगरांच्या निवडणुकीत वादाचे नगारे वाजत आहेत. महायुतीतील अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यातच नेत्यांची विधानेही गाजत असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेवरून भाजपाच्या नेत्यांनी केलेले अजब विधान चर्चेचा विषय ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. ती कुठल्या जाती-पातीसाठी नाही तर आमच्या बहिणींसाठी आणली. सख्खा भाऊही राखीपौर्णिमेला बहिणीकडे गेला असता १०० रुपये ताटात टाकताना बायकोकडे बघतो. बायकोनं मान हलवली तर ताटात टाकतो नाहीतर तशीच ती नोट पुन्हा खिशात घालतो. साडीचा तर विषय मिटलाच आहे. राखी पौर्णिमेला कोणत्याच बहिणीला आता साडी मिळत नाही. पण महिलांनो आपला देवाभाऊ दर महिन्याला खात्यात १५०० रुपये पाठवतो. त्या दीड हजारांशी इमान राखा. आपण भावाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन भाजपा नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.
महिलांना स्वाभिमान आणि सन्मान देवाभाऊंनी दिला
महिलांना स्वाभिमान आणि सन्मान याच देवाभाऊंनी दिला. आपण पाहिले की, पूर्वी १०० रुपयांसाठी नवऱ्याकडे, नाहीतर घरातल्या माणसाकडे हात पसरावे लागत होते. पण, आज अकाऊंटमध्ये महिलांना पैसे येतात. ज्या बहिणीला पूर्वी हात पसरावे लागत होते, आज तिलाच तिचा नवरा विचारतो, तुझ्या खात्यात काही शिल्लक आहेत का? हा सन्मान देवाभाऊंनी आणि भाजपाने दिला आहे. अशा भावाला विसरू नका, असेही गोरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निवडणुकीत जर कुणी पैसा वाटत असेल तर तो घ्या. पैसा कुणाचाही घ्या, पण मत देताना देवाभाऊचे १५०० रुपये लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःचा नवरा १०० रुपयेही देत नव्हता, हे विसरू नका, असे गोरे म्हणाले.
Web Summary : BJP leader Jaykumar Gore urged women to remember Devendra Fadnavis's ₹1500 monthly allowance during elections. He contrasted this with husbands who barely spend on their wives, highlighting the financial independence the scheme provides to women.
Web Summary : भाजपा नेता जयकुमार गोरे ने महिलाओं से चुनाव के दौरान देवेंद्र फडणवीस के ₹1500 मासिक भत्ते को याद रखने का आग्रह किया। उन्होंने इसकी तुलना उन पतियों से की जो अपनी पत्नियों पर मुश्किल से खर्च करते हैं, और इस योजना से महिलाओं को मिलने वाली वित्तीय स्वतंत्रता पर प्रकाश डाला।