शिक्षिकेचा विनयभंग करुन धमकी, महिलांचाही समावेश असून आठ शिक्षकांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 20:09 IST2022-01-09T20:08:40+5:302022-01-09T20:09:19+5:30
Molestation Case : ऑक्टोबर २०२१ पासून ते ४ जानेवारी २२ पर्यंत शहरातील एका शाळेत हा प्रकार घडला.

शिक्षिकेचा विनयभंग करुन धमकी, महिलांचाही समावेश असून आठ शिक्षकांविरुद्ध गुन्हा
बोदवड जि. जळगाव : शहरातील एका शिक्षिकेचा विनयभंग करुन तिला धमकी दिल्याप्रकरणी आठ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चार महिला शिक्षकांचा समावेश आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शेख रफिक अहमद ताज (रा.जामनेर), शेख मोहम्मद इसहाक अब्दुल हक (रा.मलकापूर), मो इरफान मो इब्राहिम, (रा. हिदायात नगर बोदवड), शहा रफिक अहमद फारूक शहा (रा. अकोला) समीना बेगम शेख, तरन्नुम जहा मोहम्मद खान, नूरजहाँ बेगम मोहम्मद इसहाक आणि ताजुनिस्सा शे कादिर रा भुसावळ, (चारही रा. भुसावळ) यांचा समावेश आहे.
ऑक्टोबर २०२१ पासून ते ४ जानेवारी २२ पर्यंत शहरातील एका शाळेत हा प्रकार घडला. हे आठही जण आपणास शारीरिक व मानसिक त्रास द्यायचे तसेच अश्लिल शिवीगाळ करायचे. यात रफिक अहमद व त्याचे मित्र असलेले सात शिक्षकांचा समावेश आहे. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास पतीला मारून टाकण्याची धमकी वरील लोकांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, विनयभंग आणि धमकी प्रकरणी फिर्याद देणाऱ्या शिक्षकेविरुद्ध वरील आठही जणांनी ४ जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दिली होती. ही महिला आम्हाला शिवीगाळ करीत असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याबाबत पनाका दाखल करण्यात आला होता.