शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शाखा अभियंत्याचे घर फोडले, भर दुपारी दीड लाखाचे दागिने लंपास

By हणमंत पाटील | Updated: July 19, 2024 23:41 IST

भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विटा : महावितरणच्या नेवरी उपकेंद्रात कार्यरत असलेले शाखा अभियंता नितीन शेवाळकर यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख पाच हजार रुपयांसह ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विटा ते कराड रस्त्यावरील रेवा इमारतीत घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नितीन शेवाळकर हे महावितरणच्या नेवरी उपकेंद्रात शाखा अभियंता म्हणून काम पाहत असून ते विटा येथील कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या रेवा बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्नी राधिका व मुलीसह राहण्यास आहेत. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची पत्नी राधिका या त्यांच्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. त्या वेळी अज्ञात दोन चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी चोरट्यांच्या हाताला कपाटातील रोख ५ हजार रुपये व १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण लागले. 

पत्नीला कोंडून चोरटे पसार...दरम्यान, त्याच वेळी थोड्या वेळातच राधिका या घरी पोहोचल्या. त्यावेळी चोरटे घरातच होते. त्या ठिकाणी त्यांना दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी घरात जाऊन कोण आहे, अशी विचारणा केली. त्याच वेळी चोरट्यांनी त्यांना हुलकावणी देत बाहेर येत दरवाजा बंद करीत तेथून चोरट्यांनी दुचाकीवरून पलायन केले.  या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाची पहाणी केली. याप्रकरणी राधिका शेवाळकर यांनी रात्री उशिरा विटा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली