मृतदेहाजवळ सापडल्या 'या' गोष्टी, प्रेयसीच्या घराबाहेर बंदुकीने गोळ्या झाडून संपवले स्वतःला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 21:45 IST2022-03-19T17:40:14+5:302022-03-20T21:45:01+5:30
Shot dead Case : लिसाडी गेट येथील विणकर नगर येथील रहिवासी असलेल्या नाजीमचे कोतवालीच्या शाहपीर गेट येथे राहणाऱ्या एका तरुणीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

मृतदेहाजवळ सापडल्या 'या' गोष्टी, प्रेयसीच्या घराबाहेर बंदुकीने गोळ्या झाडून संपवले स्वतःला
मेरठ - एका तरुणाने प्रेयसीच्या घराबाहेर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. तरुणाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पोलिसांना तरुणाचा मोबाईलही जवळच सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
हे आहे प्रकरण
लिसाडी गेट येथील विणकर नगर येथील रहिवासी असलेल्या नाजीमचे कोतवालीच्या शाहपीर गेट येथे राहणाऱ्या एका तरुणीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा प्रकार नातेवाईकांना कळला, त्यानंतर मुलीने घराबाहेर पडणे बंद केले. त्याने लग्नासाठी विचारणाही केली होती, पण पुढे काही बोलणी झाली नाही. यामुळे तरुण तणावाखाली होता. शुक्रवारी पहाटे तरुणाने प्रेयसीच्या घराजवळ जाऊन पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेनंतर आजूबाजूला लोकांची गर्दी झाली. पोलिसांनी मृतदेहाजवळून मोबाईल जप्त केला आहे. हा मोबाईल नाजिमचा असल्याचा सांगितला जात आहे.
तर दुसरीकडे तरुणाच्या नातेवाईकानेही हत्येचा आरोप करत गोंधळ घातला होता. पोलिसांनी कारवाईची मागणी केली आहे. सीओ अरविंद चौरसिया यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एक पिस्तूल आणि मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे. खुनाचा आरोप आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी तपास करत आहेत.