अल्पवयीन मुलाने नशेसाठी केली पासोड्या विठोबा मंदिरात चोरी; १२ तासात गुन्हा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 08:57 PM2020-06-15T20:57:47+5:302020-06-15T21:03:01+5:30

मित्राच्या मदतीने बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम पळविली होती.

Theft in Pasodya Vithoba temple by minor boys for addiction | अल्पवयीन मुलाने नशेसाठी केली पासोड्या विठोबा मंदिरात चोरी; १२ तासात गुन्हा उघडकीस

अल्पवयीन मुलाने नशेसाठी केली पासोड्या विठोबा मंदिरात चोरी; १२ तासात गुन्हा उघडकीस

Next
ठळक मुद्देहे दोघेही नशाबाज असून अगोदर त्यांनी दोन, तीन ठिकाणी केला चोरीचा प्रयत्न

पुणे : बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरुन नेणार्‍या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन १२ तासाच्या आत फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. नशेसाठी या अल्पवयीन मुलाने मित्राच्या मदतीने ही चोरी केली होती. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.पासोड्या विठोबा मंदिरात रविवारी पहाटे दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लॉकडाऊन असल्याने मंदिराच्या परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही बंद होते. आजू बाजूच्या परिसरात पोलिसांनी शोध घेतल्यावर त्यांना पहाटे ४ वाजता दोघे जण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. खडकीतील या १६ वर्षाच्या मुलाला फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याने चौकशीत चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
हे दोघेही नशाबाज असून त्यांना नशेसाठी पैसे नसल्याने त्या अगोदर त्यांनी दोन, तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर मंदिरात वरच्या बाजूने ते आत शिरले व दान पेटी स्कू ड्रायव्हरच्या सहाय्याने उचकटली व त्यातीलरक्कम चोरली होती.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, दादासाहेब गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी,हवालदार सयाजी चव्हाण व त्यांच्या सहकाºयांनी ही कामगिरी केली.

Web Title: Theft in Pasodya Vithoba temple by minor boys for addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.