नोकराचे शिर कापून मृतदेह गुंडाळला पॉलिथिनने, मग मालकाने स्वतः ला घेतले संपवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 21:49 IST2022-04-24T21:49:09+5:302022-04-24T21:49:31+5:30

Murder And suicide Case :नोकराच्या भावाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत असून या प्रकरणात अन्य लोकांचाही सहभाग असण्याची भीती पोलिसांना आहे.

The servant's head was cut off and the body was wrapped in polythene, then the owner took it and finished it | नोकराचे शिर कापून मृतदेह गुंडाळला पॉलिथिनने, मग मालकाने स्वतः ला घेतले संपवून

नोकराचे शिर कापून मृतदेह गुंडाळला पॉलिथिनने, मग मालकाने स्वतः ला घेतले संपवून

उत्तर प्रदेशातीलसहारनपूर जिल्ह्यातील नानौता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोना अजुरुनपूर गावात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आधी मालकाने नोकराचा शिरच्छेद करून खून केला आणि त्यानंतर पोलीस पकडतील या भीतीने मालकाने आत्महत्या केली. नोकराच्या भावाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत असून या प्रकरणात अन्य लोकांचाही सहभाग असण्याची भीती पोलिसांना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोना अजुरुनपूर गावात राहणारे ४० वर्षीय शेतकरी विनोद राणा यांचा मुलगा विनोद राणा शुक्रवारी शेतात सुरू असलेली कूपनलिका बंद करण्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याची काहीच माहिती मिळत नव्हती. सकाळी आठ वाजता शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना विनोदचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेला दिसला. तर येथून सुमारे दीडशे मीटर अंतरावर असलेल्या विनोद यांच्या ट्यूबवेलच्या टाकीत त्यांचा नोकर प्रवीण याचा मृतदेह आढळून आला. प्रवीणचे डोकं आणि हात कापलेलं होते, तर मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला होता जो कुजला होता.

मृतदेह पाहून काही दिवसांपूर्वी प्रवीणची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच एसएसपी आकाश तोमर आणि एसपी देहत सूरज राय घटनास्थळी पोहोचले आणि प्रवीणच्या डोक्याचा शोध घेण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. काही तास शोध घेतल्यानंतर गावातील तलावाजवळ पोलिसांना प्रवीणचे शिर सापडले.

Web Title: The servant's head was cut off and the body was wrapped in polythene, then the owner took it and finished it