पेटत्या सुटकेसमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, आरोपींनी हत्या करून केला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 22:08 IST2022-04-11T22:08:28+5:302022-04-11T22:08:53+5:30
Murder Case : पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

पेटत्या सुटकेसमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, आरोपींनी हत्या करून केला धक्कादायक प्रकार
भोपाळ - सुटकेसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने इंदूरमध्ये खळबळ उडाली. आरोपी इतक्यावरच न थांबता त्यांनी सुटकेसला आगही लावली. आग लावल्यानंतर पोलिसांना याची सूचना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना निहालपूर मंडी जवळ आहे. राजेंद्र नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी याबाबत सूचना मिळाली होती. या सुटकेसमध्ये एक मृतदेह होता. त्या सुटकेसला आग लावली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. अद्याप हा मृतदेह कोणाचा याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुटकेसच्या आधारावर तिचा शोध घेत आहे.
पत्नी गेली सोडून म्हणून दुसऱ्या महिलेला घातली लग्नाची मागणी; नकार दिल्याने झाडली गोळी अन्...
मृत तरुणाचं वय साधारण 30 वर्षे आहे. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूच्या खुणा होत्या. यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि पेट्रोल टाकून पेटवून दिला. मात्र मृतदेह पूर्णपणे जळलेला नाही. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी अंगावरचे कपडेही काढून टाकण्यात आले होते. या प्रकरणात अवैध संबंधांची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.