देवभूमीत दहशतीचं सावट! गल्ला मंडीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास चक्रे वेगवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:23 IST2026-02-12T19:21:41+5:302026-02-12T19:23:02+5:30

मृतदेहांची अवस्था इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

Terror in Devbhoomi! Two bodies found in Galla Mandi; Police speed up investigation | देवभूमीत दहशतीचं सावट! गल्ला मंडीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास चक्रे वेगवान

देवभूमीत दहशतीचं सावट! गल्ला मंडीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास चक्रे वेगवान

शांत आणि निसर्गरम्य मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरात आज एका भीषण दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडवून दिली आहे. शहरातील गजबजलेल्या गल्ला मंडी परिसरात एका तरुण आणि तरुणीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले आहेत. विशेष म्हणजे, मारेकऱ्यांनी अत्यंत क्रूरपणे जड दगडाने दोघांचेही चेहरे ठेचले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी उघडकीस आला थरार 

नेहमीप्रमाणे आज सकाळी स्थानिक नागरिक आणि व्यापारी मंडी परिसरात गेले असता, त्यांना दोन मृतदेह पडलेले दिसले. मृतदेहांची अवस्था इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. मृतांची ओळख पटू नये या उद्देशाने मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड दगडाने वार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलीस प्रशासनात धावपळ 

भरवस्तीत झालेल्या या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली. एसपी सिटी मनोज कत्याल, सीओ अमित कुमार आणि कोतवालीचे विजय मेहता यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. ही हत्या याच ठिकाणी झाली की दोघांना दुसरीकडे मारून मृतदेह येथे आणून फेकण्यात आले, या दिशेनेही तपास सुरू आहे.

सीसीटीव्ही आणि कागदपत्रांवरून तपास सुरू 

पोलिसांना घटनास्थळाजवळ काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत, ज्याच्या आधारे मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, रात्रीच्या वेळी या परिसरात कोणाची ये-जा होती का, हे तपासण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले जात आहेत. सूडाच्या भावनेतून किंवा जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लवकरच आरोपी जेरबंद करू: एसपी सिटी 

या प्रकरणावर बोलताना एसपी सिटी मनोज कत्याल म्हणाले की, "हे प्रकरण अत्यंत गंभीर असून तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. या हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील." सध्या खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंडी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Web Title : उत्तराखंड में दहशत: मंडी में दोहरे हत्याकांड से हड़कंप, जांच जारी

Web Summary : हल्द्वानी में एक व्यस्त मंडी में दोहरे हत्याकांड से सनसनी फैल गई। एक युवा जोड़ा पत्थरों से बेरहमी से मारा गया। पुलिस सबूत जुटा रही है और अपराधियों की पहचान के लिए सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है। हाई अलर्ट घोषित।

Web Title : Uttarakhand Shaken: Double Murder in Market, Investigation Underway

Web Summary : Haldwani grapples with a shocking double murder in a bustling market. A young couple was found dead, brutally murdered with stones. Police are investigating, gathering evidence, and reviewing CCTV footage to identify the perpetrators and motive. High alert declared.