संतापजनक! कॉलेजमध्ये लेक्चरर झाला हैवान; होमवर्क न केल्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:35 IST2026-03-11T11:35:00+5:302026-03-11T11:35:56+5:30

एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चररने विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

telangana medak polytechnic college lecturer brutally beat students for homework | संतापजनक! कॉलेजमध्ये लेक्चरर झाला हैवान; होमवर्क न केल्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

AI फोटो

तेलंगणातील मेडक जिल्हयातील एका कॉलेजमधून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील रत्नपुरी गावातील तुर्कल खानापूर भागात असलेल्या एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चररने विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नपुरी पॉलिटेक्निक कॉलेजमधील लेक्चरर शिवा रेड्डी यांनी होमवर्क पूर्ण न केल्यामुळे विद्यार्थ्यांवर हल्ला केला. लेक्चररने रागाच्या भरात विद्यार्थ्यांना काठीने आणि हाताने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मारहाण करताना ते सतत शिवीगाळ देखील करत होते. जेव्हा काही विद्यार्थ्यांना होमवर्कबद्दल विचारण्यात आले तेव्हा ही घटना घडली. 

विद्यार्थ्यांनी होमवर्क पूर्ण झाला नसल्याचं सांगताच लेक्चरर शिवा रेड्डी अचानक संतापले आणि त्यांनी वर्गातच विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका शिक्षकाकडून असे अमानवीय कृत्य घडावं, हे धक्कादायक असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

घटनेची माहिती मिळताच तुर्कला खानापूर परिसरातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती गोळा केली. पोलिसांनी आरोपी लेक्चरर शिवा रेड्डी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सध्या पोलीस आरोपी लेक्चररची चौकशी करत असून कॉलेज प्रशासनाकडूनही या प्रकरणावर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

Web Title : गुस्सा! होमवर्क न करने पर लेक्चरर ने छात्रों को बेरहमी से पीटा

Web Summary : तेलंगाना के एक कॉलेज में होमवर्क पूरा न करने पर एक लेक्चरर ने छात्रों को बेरहमी से पीटा, जिससे वे गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है, जिससे अभिभावकों और स्थानीय लोगों में आक्रोश है। लेक्चरर पर गाली देने का भी आरोप है।

Web Title : Outrage! Lecturer Turns Beast, Brutally Assaults Students for Unfinished Homework

Web Summary : A lecturer in Telangana brutally assaulted students for not completing homework, causing serious injuries. Police have registered a case, and an investigation is underway, sparking outrage among parents and locals. The lecturer is also accused of verbal abuse.