११वीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याची शिक्षकाने हत्या केल्याची घटना उजेडात आली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. शिक्षकाने सौरभला भेटायला बोलावलं. जेव्हा सौरभ पिंपळाच्या झाडाखाली पोहोचला, तेव्हा शिक्षकाने अचानक हल्ला करत त्याच्या गळ्यावरूनच चाकू फिरवला.
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सौरभ पाल असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवारी सांयकाळी त्याला शिक्षकाने भेटायला ये असे सांगून बोलून घेतले. पण, सौरभ भेटायला बोलावलेल्या ठिकाणी पोहोचताच त्याच्यावर वार केले.
शिक्षकाने विद्यार्थ्याची हत्या केली, नक्की काय घडले?
सौरभचा चुलत भाऊ अजय पाल याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, धुन्नू सिंह किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक असलेल्या अनूप सिंहने रविवारी सायंकाळी ६.३० वाजता सौरभला कॉल केला.
अनूप सिंह सौरभला म्हणाला की, शाळेजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ भेटायला ये. सायंकाळी ७ वाजता जेव्हा सौरभ तिथे पोहोचला. तेव्हा आरोपी शिक्षक आधीच तिथे दबा धरून बसलेला होता. सौरभ दिसताच त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि गळ्यावर चाकूने वार केले.
जीव वाचवण्यासाठी पळाला पण...
आरोपीने वार करताच सौरभ जोरात ओरडला. या हल्ल्यात तो जखमी झाला आणि जमिनीवर पडला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
जखमी झालेला सौरभ कसा बसा उठला. रक्तस्राव रोखून धरत तो पळत जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर गेला. रक्तबंबाळ सौरभला बघून कर्मचारीही घाबरले. त्यांनी लगेच त्याच्या बहिणीला कॉल करून माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल कऱण्यात आले.
डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. पण, प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
बहीण-भाऊजीसोबत राहत होता सौरभ
१७ वर्षीय सौरभ मूळचा अंबियापूर गावचा रहिवासी होता. मागील ५ वर्षांपासून तो त्याची बहीण ऋची आणि भाऊजी चंद्रशेखर यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होता. सौरभचे वडील सुभाष पाल यांचा आधी निधन झालेले आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a teacher murdered his 11th-grade student, Saurabh, over a petty dispute. The teacher called Saurabh to a meeting spot and fatally attacked him with a knife. Saurabh succumbed to his injuries in the hospital. Police are investigating.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक शिक्षक ने 500 रुपये के मामूली विवाद में अपने 11वीं कक्षा के छात्र सौरभ की हत्या कर दी। शिक्षक ने सौरभ को मिलने के लिए बुलाया और चाकू से घातक हमला किया। अस्पताल में सौरभ ने दम तोड़ दिया। पुलिस जांच कर रही है।