शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 20:04 IST

जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

ठळक मुद्दे जेणेकरून हे पाणी पिऊन तेथील शिपाई, अन्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा कट त्याने आखला.गुरपिंदर हे कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्तव्यावर कार्यरत होते.ज्यावेळी पोलीस शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वेगळाच वास येत होता.

लुधियाना - भावाला अटक केल्याने एका तरूणाने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने बस्ती जोधेवालच्या कृ्ष्णा कॉलनी परिसरातील एका क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला. जेणेकरून हे पाणी पिऊन तेथील शिपाई, अन्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा कट त्याने आखला.

जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. बस्ती जोधेवाल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिपाई असलेल्या गुरपिंदर सिंग यांच्या तक्रारीवरून कृ्ष्णा कॉलनी येथे राहणारा वरिंदर उर्फ नितीका खुंसी आणि चूहड़पुर गावात राहणार त्याचा साथीदार गौरव आणि त्याची बहीण सिमरनविरुद्ध हत्येचा कट रचल्याप्रकरणात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला अटक केली आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आले. येथून या तिघांनाही एक दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला आहे. पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत. तपास अधिकारी एएसआय राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपी वरिंदरचा भाऊ जतिंदर सिंग यांच्या विरोधात लुटमारी आणि लुटमारीचा कट रचणे यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.


पोलिसांनी आरोपी जतिंदरला याआधी अटक केली होती. यावेळी या तपास पथकात शिपाई गुरपिंदर सिंग यांचा समावेश होता. त्याचा बदला घेण्यासाठी जतिंदरचा भाऊ वरिंदर याने गुरपिंदरविरोधात कट रचला. गुरपिंदर हे कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्तव्यावर कार्यरत होते. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने क्वारंटाईन सेंटरमधील दाखल असलेल्या रुग्णांनाही सोडणार नाही असे ठरवले आणि पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला. 

ज्यावेळी पोलीस शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वेगळाच वास येत होता. त्या वासामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. यावेळी सोबतच्या कर्मचाऱ्यांना सांगितले तेव्हा कळाले आरोपी छतावर होते. यावेळी तपासादरम्यान आरोपींनी बदला घेण्यासाठी म्हणून या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळला असल्याचं समोर आले. एएसआय राधेश्याम यांनी आरोपींना न्यायालयात सादर केल्यानंतर पोलिस रिमांडमध्ये पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती दिली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

टॅग्स :PoliceपोलिसPunjabपंजाबArrestअटक