शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याचे संशयास्पद मृत्यू प्रकरण : यवतमाळ येथे दोन ठाणेदारांसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 23:24 IST

Crime News : दोन वर्षांपूर्वी तलाठ्यांच्या संशयास्पद मृत्य प्रकरणी शनिवारी रात्री येथील अवधूतवाडी पोलोके ठाण्यात चार पोलिसांसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यवतमाळ : येथील दांडेकर ले-आऊटमध्ये सासऱ्याच्या घरी एका तलाठ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रथम आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, मृताच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्या मुलाचा खून झाल्याची याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी उशिरा रात्रीपर्यंत दोन ठाणेदारांसह एकूण आठजणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अवधूतवाडीचे विद्यमान ठाणेदार आनंद वागतकर, तत्कालीन ठाणेदार व घांटजीचे विद्यमान ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, पीएसआय ज्ञानेश्वर धावडे यांच्यासह एक जमादार, मृताचे सासू-सासरे, पत्नी आणि साळा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. विजय गोविंद गाडवे (रा. गुरुनानकनगर, गोदणी रोड, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. २६ जून २०१८ रोजी त्यांचा सासऱ्याच्या घरी दांडेकर ले-आऊटमध्ये मृत्यू झाला होता. सासरच्या मंडळीने त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मात्र, मृताची आई भीमाबाई गाडवे यांनी आपल्या मुलाची आत्महत्या नसून त्याचा सासरच्यांनी खून केल्याचा आरोप केला होता. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून न्यायालयाने यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी चौकशी करून संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. चार दिवसांपूर्वी न्यायालयाने हा निर्णय सुनावला.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी केली. तपासाअंती आठजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसपींनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी शनिवारी उशिरा रात्री अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आठ जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ