शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 21:04 IST

सुशांत संकटात असल्याबाबत २५ फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना कळवले होते असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

ठळक मुद्देओ. पी. सिंग (आयपीएस) हे सुशांतचे मेहुणे असून त्यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त (झोन - ९) यांना याबाबत व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मेसेज केले होते. झोन- ९ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी स्पष्टपणे लेखी तक्रारीशिवाय शक्य नसल्याचे कळवले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये तपासावरून मतभेदाची भिंत निर्माण झाली आहे. या दरम्यान आता सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे. सुशांत संकटात असल्याबाबत २५ फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना कळवले होते असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. मात्र, मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी याबाबत खुलासा करत २५ फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार केली असल्याचं म्हटले आहे.ओ. पी. सिंग (आयपीएस) हे सुशांतचे मेहुणे असून त्यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त (झोन - ९) यांना याबाबत व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मेसेज केले होते. त्यावर पोलीस उपायुक्त (झोन - ९) यांनी सिंग यांना कॉल केला आणि या तपासासाठी किंवा कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार बंधनकारक असल्याने लेखी तक्रार देण्यास विनंती केली होती. मात्र. सिंग यांनी तोंडी तक्रारीवर तपास करण्यास कळवले. मात्र त्यावर झोन- ९ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी स्पष्टपणे लेखी तक्रारीशिवाय शक्य नसल्याचे कळवले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  सुशांतचे वडील के के सिंग यांनी या व्हि़डिओमध्ये म्हणाले की,  25 फेब्रुवारी रोजी सुशांत संकटात असल्याचे मी मुंबई पोलिसांना सांगितले होते. 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मुंबई पोलिसांनी 25 फेब्रुवारीच्या तक्रारीत दिलेल्या नावांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्याच्या मृत्यूच्या 40 दिवसांनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मी पाटण्यात एफआयआर दाखल केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाटणा आणि मुंबई पोलिसांतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

 

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबई