Suicide attempt by women with burning | महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : रुपीनगर येथे महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आली.शीतल किरण ठवाळ (वय २८, रा. रुपीनगर, तळवडे) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला तिच्या पतीसह मागील तीन महिन्यांपासून रुपीनगर येथे राहण्यासाठी आली आहे. शीतल यांचे पती मंगळवारी सकाळी कामानिमित्त मुंबईला गेले. दरम्यान, एक वाजण्याच्या सुमारास शीतल यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद केला आणि पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वेळेनंतर त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना पावणेदोनच्या सुमारास काहीतरी जळाल्याचा वास आला. त्यानंतर नागरिकांनी खालच्या मजल्यावर येऊन पाहिले असता शीतल यांच्या घरातून धूर येत होता. तसेच दरवाजा आतून बंद होता.
  नागरिकांनी तात्काळ चिखली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शीतल या जळालेल्या अवस्थेत दिसल्या. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या शीतल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत

Web Title: Suicide attempt by women with burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.