शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 04:54 IST

पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिलोली (जि़ नांदेड) : शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सातवीच्या अल्पवयीन मुलीस मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांसह प्राचार्य, मुख्याध्यापक व स्वयंपाकी महिला अशा पाच जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सहशिक्षक सय्यद रसूल, दयानंद राजुळे, प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, स्वयंपाकी सुरेखाबाई बनसोडे अशी या पाच जणांची नावे आहेत.पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दोन महिन्यांपूर्वी श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक रसूल सय्यद व दयानंद राजुळे यांनी पीडित मुलीस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नृत्याचे व्हिडीओ दाखवतो म्हणून बंद खोलीत नेले़ तेथे तिला मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ व फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केला़ तसेच या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. मुलीने संबंधित प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने दोन महिन्यांपूर्वी शाळा गाठून मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती़ त्या वेळी मुख्याध्यापक व इतरांनी पीडित मुलीच्या आईची समजूत घालून परत पाठविले होते़ तसेच ही बाब कोणासही न सांगण्याच्या अटीवरून अल्पवयीन मुलीच्या आईकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले होते़ पीडित मुलीची आई मजुरी करते़ मुलीच्या बदनामीच्या भीतीने त्याही गप्प राहिल्या़ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे गुन्हागावात याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी पीडित मुलीच्या आईला ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला़ आईच्या तक्रारीनुसार, उपरोक्त पाच जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़, असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड