Video : खळबळजनक! शिक्षकाने केला विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 13:46 IST2019-10-22T13:44:26+5:302019-10-22T13:46:59+5:30
शिक्षकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Video : खळबळजनक! शिक्षकाने केला विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार
पुणे - ट्युशनकरिता खासगी कोचिंग क्लासमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींचे शिक्षकानेचलैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी चौकशीसाठी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर शिक्षा अकॅडमी नावाचा खासगी क्लास आहे. तिथे इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतचे क्लासेस चालतात. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थिनींना संचालक जयप्रकाश पाटील हे मुलींना केबिनमध्ये बोलवून त्रास देत असत. त्यांना स्पर्श करणे, अश्लील बोलणे असे त्यांचे वर्तन होते. अखेर मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी सदर शिक्षकाला क्लासमध्ये जाऊन चोप दिला. या संबंधीचा सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे.