शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बापरे! शाळेची बस सुटली म्हणून विद्यार्थ्यानं घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 4:37 PM

Suicide Case : स्टॉपवर पोहोचताच बस आली, पण बस भरलेली असल्याने कंडक्टरने शाळेतील मुलांना बसमध्ये घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुलसह इतर मुले घरी परतली.

मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेत न जाण्यास मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटना बैतूलच्या चोपना पोलीस स्टेशन हद्दीतील आम दोष गावातील आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.राहुल सरदार अमडोह गावापासून 6 किमी अंतरावर असलेल्या चोपना येथील सरकारी शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो गावातील इतर मुलांसोबत प्रवासी बसने शाळेत जात असे. सोमवारी सकाळी नऊ वाजता तो शाळेत जाण्यासाठी घरून निघाला. स्टॉपवर पोहोचताच बस आली, पण बस भरलेली असल्याने कंडक्टरने शाळेतील मुलांना बसमध्ये घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुलसह इतर मुले घरी परतली.

राहुलला शाळा चुकवायची नव्हतीराहुलला शाळा चुकवायची नव्हती, असे सांगितले जात आहे. शाळेत पोहोचू न शकल्याने नाराज राहुल घराच्या मागच्या बाजूला गेला. बराच वेळ तो दिसला नाही तेव्हा आई त्याला शोधत आली, त्यावेळी तो झाडाला लटकला आढळला होता. राहुलचे वडील मुंबईत सुतारकाम करतात. ते सध्या मुंबईत आहे.राहुलचे काका कनिक सांगतात की, त्याच्या वहिनीने सांगितले तो शाळेत जात आहे, पण बस चुकल्यामुळे शाळेत जाऊ शकलो नाही आणि घरी परतला. काही वेळाने त्याने घरामागील झाडाला गळफास लावून घेतला.आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतरच समजेलसध्या राहुलच्या आत्महत्येमागील नेमके कारण तपासानंतरच समजेल, असे डॉ.अभिनव शुक्ला सांगतात. आजकाल अनेक विद्यार्थी आणि तरुण नैराश्याने आत्महत्या करत आहेत. सोशल मीडियावरील मुलांची वाढती ॲक्टिव्हिटी याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. अशा स्थितीत कुटुंबाने मुलांच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

घोराडोंगरी पोलीस चौकीचे प्रभारी रवी शाक्य सांगतात की, मृताच्या आईने सांगितले राहुल सकाळी ९ वाजता शाळेसाठी निघाला होता पण त्याची बस चुकली आणि तो रागाच्या भरात घरी आला आणि काही वेळाने तो झाडाला लटकलेला आढळला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीSchoolशाळा