शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
5
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
6
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
7
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
8
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
9
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
10
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
11
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
12
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
13
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
14
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
15
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
16
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
17
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
18
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
19
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
20
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 10:19 PM

उद्या, म्हणजेच 7 मे रोजी सकाळी 8:04 वाजता सुनीता विल्यम्स यांचे यान उड्डान घेईल.

Sunita Williams NASA :भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) इतिहास रचण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्या म्हणजेच, 7 मे रोजी त्या पुन्हा एकदा अंतराळात जाणार आहे. सुनीता विल्यम्स बोईंगच्या स्टारलाइनर (Starliner) यानातून अंतराळात जातील. अंतराळवीर बुच विल्मोर (Butch Wilmore) हेदेखील त्यांच्यासोबत असतील. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या म्हणण्यानुसार, हे यान भारतीय वेळेनुसार सकाळी 8:04 वाजता  केनेडी स्पेस सेंटर येथू प्रक्षेपित होईल. 

बोईंग स्टारलाइनरमधून पहिल्यांदाच अंतराळवीरांना अंतराळात नेले जात आहे. यापूर्वी 2019 मध्ये Boe-OFT आणि 2022 मध्ये Boe-OFT2 लॉन्च करण्यात आले होते. विशेष म्हणजे, स्टारलाइनर मिशनसाठी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे एक आठवडा घालवतील.ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळ क्षेत्रातील हे मोठे पाऊल मानले जाईल. 

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार 59 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत दोनवेळा अंतराळ प्रवास केला आहे. याआधी 2006 आणि 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. त्यांनी अंतराळात एकूण 322 दिवस घालवले आहेत. 2006 मध्ये 195 दिवस तर 2012 मध्ये 127 दिवस त्या अंतराळात होत्या. सुनीता विल्यम्स या अंतराळात प्रवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या.

कोण आहेत सुनीता विल्यम्स?सुनीता विल्यम्स 1987 मध्ये यूएस नेव्हल अकादमीमधून पदवी घेतल्यानंतर नासामध्ये दाखल झाल्या होत्या. 1998 मध्ये त्यांची नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली. त्यांचे वडील दीपक पांड्या 1958 मध्ये अहमदाबादहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सुनीताचा जन्म 1965 मध्ये झाला. यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्सनेही लढाऊ विमानेदेखील उडवली आहेत. त्यांना 30 प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. सुनीता यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केले असून, मायकेल टेक्सासमध्ये पोलिस अधिकारी होते. 

टॅग्स :NASAनासाisroइस्रोAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत