बापरे! शाळेची बस सुटली म्हणून विद्यार्थ्यानं घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:37 PM2021-11-23T16:37:01+5:302021-11-23T16:39:01+5:30

Suicide Case : स्टॉपवर पोहोचताच बस आली, पण बस भरलेली असल्याने कंडक्टरने शाळेतील मुलांना बसमध्ये घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुलसह इतर मुले घरी परतली.

The student committed suicide as the school bus left; the family in tension | बापरे! शाळेची बस सुटली म्हणून विद्यार्थ्यानं घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबाला धक्का

बापरे! शाळेची बस सुटली म्हणून विद्यार्थ्यानं घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबाला धक्का

Next

मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेत न जाण्यास मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटना बैतूलच्या चोपना पोलीस स्टेशन हद्दीतील आम दोष गावातील आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

राहुल सरदार अमडोह गावापासून 6 किमी अंतरावर असलेल्या चोपना येथील सरकारी शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो गावातील इतर मुलांसोबत प्रवासी बसने शाळेत जात असे. सोमवारी सकाळी नऊ वाजता तो शाळेत जाण्यासाठी घरून निघाला. स्टॉपवर पोहोचताच बस आली, पण बस भरलेली असल्याने कंडक्टरने शाळेतील मुलांना बसमध्ये घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुलसह इतर मुले घरी परतली.



राहुलला शाळा चुकवायची नव्हती

राहुलला शाळा चुकवायची नव्हती, असे सांगितले जात आहे. शाळेत पोहोचू न शकल्याने नाराज राहुल घराच्या मागच्या बाजूला गेला. बराच वेळ तो दिसला नाही तेव्हा आई त्याला शोधत आली, त्यावेळी तो झाडाला लटकला आढळला होता. राहुलचे वडील मुंबईत सुतारकाम करतात. ते सध्या मुंबईत आहे.

राहुलचे काका कनिक सांगतात की, त्याच्या वहिनीने सांगितले तो शाळेत जात आहे, पण बस चुकल्यामुळे शाळेत जाऊ शकलो नाही आणि घरी परतला. काही वेळाने त्याने घरामागील झाडाला गळफास लावून घेतला.

आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतरच समजेल

सध्या राहुलच्या आत्महत्येमागील नेमके कारण तपासानंतरच समजेल, असे डॉ.अभिनव शुक्ला सांगतात. आजकाल अनेक विद्यार्थी आणि तरुण नैराश्याने आत्महत्या करत आहेत. सोशल मीडियावरील मुलांची वाढती ॲक्टिव्हिटी याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. अशा स्थितीत कुटुंबाने मुलांच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष देण्याची गरज आहे.


घोराडोंगरी पोलीस चौकीचे प्रभारी रवी शाक्य सांगतात की, मृताच्या आईने सांगितले राहुल सकाळी ९ वाजता शाळेसाठी निघाला होता पण त्याची बस चुकली आणि तो रागाच्या भरात घरी आला आणि काही वेळाने तो झाडाला लटकलेला आढळला.

Read in English

Web Title: The student committed suicide as the school bus left; the family in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.