शाळेच्या खोलीतून ऐकू येत होता रडण्याचा आवाज, आईने धक्का देऊन दरवाजा उघडला तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 21:28 IST2022-01-07T21:27:35+5:302022-01-07T21:28:18+5:30
Pocso Case : मुलीच्या आईने खोलीचा दरवाजा ढकलून उघडला असता मुलगी अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसले व शाळेचे शिक्षक धनराज मीना तेथे उपस्थित होते.

शाळेच्या खोलीतून ऐकू येत होता रडण्याचा आवाज, आईने धक्का देऊन दरवाजा उघडला तर...
राजस्थानमधील करौली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकाने बलात्कार केला होता. आरोपी शिक्षकालापोलिसांनी अवघ्या 36 तासांत अटक करून तुरुंगात पाठवले. ही मुलगी गावातीलच एका शाळेत शिकत असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ती अभ्यासासाठी शाळेत गेली होती. सायंकाळी मुलीची आई तिला घेण्यासाठी शाळेत गेली असता एका खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज येत असून खोलीला आतून कुलूप असल्याचे दिसले.
शिक्षकाने ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
त्यानंतर मुलीच्या आईने खोलीचा दरवाजा ढकलून उघडला असता मुलगी अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसले व शाळेचे शिक्षक धनराज मीना तेथे उपस्थित होते. आरोपीने मुलीच्या आईला पाहताच तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक शैलेंद्र सिंह यांच्या देखरेखीखाली पोलिस अधीक्षकांनी तोडाभीम पोलिस ठाण्याचे अधिकारी रामखिलाडी मीना यांना आरोपींना लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी 36 तासांत आरोपी शिक्षकाला अटक केली
मुलीने आपल्या जबाबात सांगितले की, शिक्षक धनराज मीना याने तिला ट्यूशनच्या बहाण्याने शाळेत बोलावले होते आणि ट्यूशनच्या बहाण्याने धनराजने तिच्यासोबत गैरकृत्य केले. पीडित मुलीने घरी येऊन सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर वडिलांनी आरोपी धनराज मीणाविरुद्ध तोडाभीम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल
तोडाभीमचे पोलीस अधिकारी राम खिलाडी मीना यांनी सांगितले की, आयपीसी कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे. अवघ्या ३६ तासांत आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. या घटनेनंतर शाळेत आरोपी शिक्षकाविरोधात संतापाचे वातावरण आहे.