Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:04 IST2025-06-18T13:03:26+5:302025-06-18T13:04:11+5:30

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : राजा रघुवंशीच्या कुटुंबाने सोनमच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Sonam Raghuvanshi family net worth father runs flour mill how become millionaire he earns so much | Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती

Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती

सोनम रघुवंशी सध्या शिलाँग पोलिसांच्या ताब्यात आहे. तिची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान राजा रघुवंशीच्या कुटुंबाने सोनमच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राजाच्या कुटुंबाचा आरोप आहे की, सोनमच्या कुटुंबाने काही दिवसांत इतके पैसे कुठून कमावले? कुटुंबाने इतके पैसे कमावले की, नातेवाईकांच्या नावावर खाती उघडली गेली आहेत. यासोबतच सोनमने आरोपी राज कुशवाहच्या आईच्या नावावरही बँक खातं सुरू केलं होतं. सोनमचे वडील इंदूरमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पीठ गिरणीचा म्हणजेच चक्कीचा व्यवसाय सुरू केला.

सोनमच्या कुटुंबाने नंतर प्लायवुड व्यवसायात पाऊल ठेवलं आणि कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केलं. आता या कुटुंबावर हवाला व्यवसायाचा आरोप होत आहे. राजाचं कुटुंब या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहे. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते इंदूरमधील गोविंद नगर येथे राहायला आले. सुरुवातीला त्यांना व्यवसायात यश मिळालं नाही आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.

"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

एक वेळ अशी आली की, त्यांना त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता विकावी लागली. त्यांनी पुन्हा ३५ लाख रुपयांनी प्लायवुड कंपनी सुरू केली. हळूहळू त्यांचं काम सुरू झाले. त्यांचा मुलगा गोविंद आणि मुलगी सोनम यांनीही त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. आज मंगल सिटीमध्ये बालाजी प्लायवुड नावाने त्यांचं शोरूम आहे. सोनम आणि राज कुशवाह यांच्यासह अनेक लोक येथे काम करत होते.

सोनमचा भाऊ गोविंद गुजरात आणि महाराष्ट्रात व्यवसाय वाढवण्याचं काम करत होता. प्लायवुडचे साहित्य कुठे पाठवायचे आणि कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं याची जबाबदारी सोनमवर होती. गोविंद मध्य प्रदेश तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील व्यावसायिकांना भेटून व्यवसाय वाढवत असे.

 "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन

स्थानिक लोक म्हणतात की, सोनमचं कुटुंब पूर्वी साधे जीवन जगत होते. घर देखील खूप साधं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी एक मोठं घर बांधलं आहे, ज्यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत.कुटुंबाने कमाईची कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु व्यवसायानुसार, एका वर्षात उलाढाल कोटींची आहे.सोनमच्या कुटुंबातील तीन लोक थेट व्यवसायाशी संबंधित आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. 

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

कुटुंबातील सदस्यांसोबत कंपनीच्या नावावर देखील एक खातं आहे. असं असूनही सोनमने तिचा चुलत भाऊ जितेंद्र रघुवंशीच्या नावावर खातं उघडलं होतं. जितेंद्रच्या नावावर चार बँक खाती होती, ज्याद्वारे लाखो रुपयांचे व्यवहार होत होते. मेघालय पोलीस इतर खात्यांचीही चौकशी करत आहेत.राजाच्या कुटुंबाचा आरोप आहे की सोनमच्या कुटुंबाने हवाला रॅकेटमध्ये सामील होऊन भरपूर संपत्ती कमावली आहे. 
 

Web Title: Sonam Raghuvanshi family net worth father runs flour mill how become millionaire he earns so much