हॉटेलमध्ये इंजिनिअरनं संपवलं आयुष्य; कहाणीत ट्विस्ट आला अन् गर्लफ्रेंडला झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:21 IST2025-04-15T13:22:36+5:302025-04-15T14:21:06+5:30
पोलीस मृत उमेशचा मोबाईल तपासत आहे. इरमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा मित्र संतोष त्याचा शोध सुरू आहे.

हॉटेलमध्ये इंजिनिअरनं संपवलं आयुष्य; कहाणीत ट्विस्ट आला अन् गर्लफ्रेंडला झाली अटक
नोएडाच्या सेक्टर २७ इथं एका हॉटेलमधील इंजिनिअरच्या आत्महत्येत नवा ट्विस्ट समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी मृत इंजिनिअरची गर्लफ्रेंड हिला अटक केली आहे. ती मथुराची रहिवासी असून नोएडात बीबीएचं शिक्षण घेत आहे. या दोघांची भेट २ वर्षापूर्वी एका डेटिंग APP वर झाली होती. १० एप्रिलला इंजिनिअरने हॉटेलच्या रूमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड आणि पाळीव श्वानही तिथेच होता. सध्या पोलीस या युवतीची चौकशी करत आहेत.
मृत इंजिनिअरचं नाव उमेश असून तो हाथरसचा रहिवासी होता. तो विवाहित असून त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाचा वाद सुरू आहे. मृतकाच्या भावाने केलेल्या तक्रारीनुसार, गर्लफ्रेंड आणि तिचा एक सहकारी भावाचा आर्थिक आणि मानसिक छळ करत होते. उमेश आणि त्याची गर्लफ्रेंड २ वर्ष सहमतीने सोबत राहत होते. ते दोघे कुत्र्याच्या उपचारासाठी नोएडला गेले होते. त्यात या दोघांमध्ये वाद झाला असं त्याने सांगितले. उमेशच्या गर्लफ्रेंडचं नाव इरम असं आहे.
पोलीस चौकशीत तिने सांगितले की, मी आणि उमेश दोघांची भेट २ वर्षापूर्वी एका डेटिंग APP वर झाली होती. आमच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. १० एप्रिलला दोघेही पाळीव श्वानाच्या उपचारासाठी नोएडाला आलो होतो. तिथे वेमेशन ओयो हॉटेलमध्ये खोली बुक केली. दोघांनी एकत्रित जेवण केले असं सांगितले. कुत्र्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर इरम वॉशरूमला गेली, जेव्हा ती परतली तेव्हा उमेशने गळफास घेतला होता असं तिने पोलिसांना सांगितले.
तर इरम आणि संतोष नावाचा एक व्यक्ती माझा भाऊ उमेशला ब्लॅकमेल करत होते. भावाकडून गर्लफ्रेंड इरमने वेळोवेळी पैसे घेत ३० लाख रूपये हडपले होते. जेव्हा उमेश त्या पैशांची मागणी करत होता तेव्हा त्याचा मानसिक छळ करण्यात आला. उमेशला इतके छळले की तो कुणालाही याबाबत काही बोलला नाही. उमेश वर्क फ्रॉम होम करायचा. इरम त्याला भेटायला हॉटेलला येत होती. उमेशला श्वान खूप आवडायचा त्यामुळे त्याच्या उपचारावरून वाद होऊ शकत नाही. पोलीस मृत उमेशचा मोबाईल तपासत आहे. इरमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा मित्र संतोष त्याचा शोध सुरू आहे.