Satara Crime News: धक्कादायक! विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करण्याची विवाहितेकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:28 PM2021-10-06T20:28:08+5:302021-10-06T20:28:41+5:30

Satara Crime News: साताऱ्यातील धक्कादायक प्रकार; मिरजेतील एकावर विनयभंगचा गुन्हा

Shocking! youth Demanded from married woman to make a naked video call in Satara | Satara Crime News: धक्कादायक! विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करण्याची विवाहितेकडे मागणी

Satara Crime News: धक्कादायक! विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करण्याची विवाहितेकडे मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उपनगरातील एका महिलेकडे विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करण्याची (Nude video call) मागणी केल्याप्रकरणी मिरज येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री पावणेबारा या कालावधीत घडली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार तीस वर्षीय पीडित महिला सातारा शहरातील एका उपनगरात राहते. ती घरी असताना साईराज नानासाहेब काळे (रा. भारतनगर, शंभर फुटी रोड, गवळी प्लॉट, मिरज, सांगली) याने त्याच्या मोबाईलवरुन पीडित महिलेला घाणेरडे मेसेज केले. दरम्यान, साईराज याने त्या महिलेला रात्रीच्यावेळी विवस्त्र होऊन व्हिडिओ कॉल करायला सांगून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. 

दरम्यान, पीडित महिलेने साईराज याला 'तू जे काही करतोस ते मी तुझ्या बहिणीला सांगेन,' असे म्हटले असता त्याने 'याची माहिती कोणाला सांगितलीस तर तुला जीवे मारेन असे धमकावत सर्व चॅट डिलीट करण्यास सांगितले. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर साईराज काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करत आहेत.

Web Title: Shocking! youth Demanded from married woman to make a naked video call in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app