धक्कादायक! कर्जबाजारीणाला कंटाळून युवा शेतकाऱ्यांची आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 03:47 PM2021-05-29T15:47:57+5:302021-05-29T15:48:45+5:30

Suicide Case : यावर्षी नापिकी झाल्याने बँकच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. या विवंचनेतून शेतकऱ्यानी आत्महत्या केली.

Shocking! Young farmers commit suicide due to debt | धक्कादायक! कर्जबाजारीणाला कंटाळून युवा शेतकाऱ्यांची आत्महत्या  

धक्कादायक! कर्जबाजारीणाला कंटाळून युवा शेतकाऱ्यांची आत्महत्या  

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रशेखर याच्या नावे तीन एकर शेती असून हिंगणघाट येथील एचडीएफसी बँकेचे साडेतीन लाख रुपयांचे पीककर्ज आहे.

अल्लीपूर( वर्धा)  - कर्जबाजारीणाला कंटाळून युवा शेतक-यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. चंद्रशेखर वसंतराव कडवे (३३) रा. सदानंद वॉर्ड असे आत्महत्या करणा-या शेतक-यांचे नाव आहे. चंद्रशेखर याच्या नावे तीन एकर शेती असून हिंगणघाट येथील एचडीएफसी बँकेचे साडेतीन लाख रुपयांचे पीककर्ज आहे.

यावर्षी नापिकी झाल्याने बँकच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. या विवंचनेतून शेतकऱ्यानी आत्महत्या केली. घटनेचा प्राथमिक अहवाल मंडळ अधिकारी संजय भोंग व तलाठी संदीप करनाके यांनी तहसील कार्यालयाला पाठविला. मृत शेतक-यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

Web Title: Shocking! Young farmers commit suicide due to debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.