Shocking! Wife gang raped with help from facebook friends by husband | धक्कादायक! फेसबूक मित्रांच्या मदतीने पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

धक्कादायक! फेसबूक मित्रांच्या मदतीने पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

ठळक मुद्देमुख्य आरोपी रिक्षा चालक असून तो पालघर जिल्ह्यामध्ये राहतो. आरोपीने त्याच्या दोन्ही मित्रांना पत्नीवर बलात्कार करायला सांगितला. नंतर स्वत: त्याने लैंगिक जबरदस्ती केली. पत्नीने जानेवारी महिन्यात तक्रार नोंदवण्यासाठी पालघर पोलिसांकडे अर्ज केला.

मुंबई - जोगेश्वरीमध्ये पती - पत्नीच्या साताजन्माच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या दोन मित्रांच्या सहाय्याने २३ वर्षीय पत्नीवर सामूहिक बलात्कार नवऱ्यानेच घडवून आणला. २५ वर्षीय आरोपी पतीला जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी रिक्षा चालक असून तो पालघर जिल्ह्यामध्ये राहतो. त्याचे दोन साथीदार मुंबईत एका फार्मा कंपनीमध्ये नोकरीला आहेत. 

आरोपी चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला जोगेश्वरी येथे घेऊन गेला. त्यानंतर तो पत्नीला जोगेश्वरीत एका झोपडपट्टीत घेऊन गेला. त्याठिकाणी अभिषेक आणि मंगेश यादव हे त्याचे दोन मित्र आधीपासूनच हजर होते. फेसबुकवरुन त्यांची आरोपी बरोबर ओळख झाली होती, असे पोलिसांनी सांगितले. 

काय आश्चर्य! कॉल गर्ल म्हणून आलेली 'ती' पत्नीच निघाली

प्रेमात अडसर येत असल्याने एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक


आरोपीने त्याच्या दोन्ही मित्रांना पत्नीवर बलात्कार करायला सांगितला. नंतर स्वत: त्याने लैंगिक जबरदस्ती केली. या दुर्दैवी प्रकारानंतर पत्नी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाली. त्यानंतर पालघर पोलिसांनी हे प्रकरण जोगेश्वरी पोलिसांकडे हस्तांतरित केले. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली. मात्र, पत्नीने जानेवारी महिन्यात तक्रार नोंदवण्यासाठी पालघर पोलिसांकडे अर्ज केला. भा. दं. वि. कलम ३७६ - ड (सामूहिक बलात्कार) अन्वये दाखल गुन्ह्याखाली तिन्ही आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Shocking! Wife gang raped with help from facebook friends by husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.