धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 13:02 IST2019-01-19T12:56:07+5:302019-01-19T13:02:48+5:30

या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सनी रमेश टाक (३०) याला पॉक्सो तसेच धमकाविल्याच्या गुन्ह्यात अटक केली.

Shocking Sexual harassment of a school teacher in school toilet | धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण 

धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण 

ठळक मुद्देचेंबूरच्या नामांकित शाळेत हा प्रकार घडला. गोवंडी येथील रहिवासी असलेला रमेश या शाळेत शिपाई आहे.बुधवारी तक्रारदार यांचा मुलगा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुरुषांच्या शौचालयाकडे गेला.

मुंबई - शाळेच्या शौचालयातच शिपायाने शिक्षिकेच्या ७ वर्षीय चिमुरड्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सनी रमेश टाक (३०) याला पॉक्सो तसेच धमकाविल्याच्या गुन्ह्यात अटक केली.
चेंबूरच्या नामांकित शाळेत हा प्रकार घडला. गोवंडी येथील रहिवासी असलेला रमेश या शाळेत शिपाई आहे. तक्रारदार याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचा सात वर्षांचा मुलगाही याच शाळेत दुसरी इयत्तेत शिकतो. बुधवारी तक्रारदार यांचा मुलगा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुरुषांच्या शौचालयाकडे गेला. रमेशची वाईट नजर त्याच्यावर पडली. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत, रमेश त्याच्या मागे गेला आणि शौचालयात त्याने त्याच्यासोबत अश्लील चाळे केले.
मुलाने रडण्यास सुरुवात करताच, रमेशने त्याला दम दिला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने मुलाला दिली. मात्र, मुलाने रडतरडत आईकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार आईने बुधवारी रात्री चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिपायाविरुद्ध पॉक्सो, धमकाविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: Shocking Sexual harassment of a school teacher in school toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.