धक्कादायक! दगड, कोयत्याने पत्नीचा खून; मामुर्डी येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 04:19 PM2020-07-06T16:19:23+5:302020-07-06T16:20:58+5:30

भांडणामुळे आठ दिवसांपासून पतीपत्नी राहात होते वेगळे 

Shocking! murder of wife by stone stroke and weapon, Incident at Mamurdi | धक्कादायक! दगड, कोयत्याने पत्नीचा खून; मामुर्डी येथील घटना 

धक्कादायक! दगड, कोयत्याने पत्नीचा खून; मामुर्डी येथील घटना 

Next
ठळक मुद्देघटनेनंतर संबंधित महिलेचा पती गेला पळून

किवळे : गेल्या आठ दिवसांपासून भांडणामुळे वेगळे राहत असलेल्या पत्नीला तिच्या पतीने कोयता व दगडाने मारून जखमी केले. यात गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मामुर्डी येथे रविवारी (दि. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संबंधित महिलेचा पती पळून गेला.
अबिदा बेगम (वय ४०, रा. मामुर्डी, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर करीमशा अहमद शेख (वय ४५) असे फरार झालेल्या पतीचे नाव आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शेख पतीपत्नीची भांडणे झाली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून ते दोघे वेगळे राहत होते. त्यांचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. अबिदा व त्यांचा मुलगा आयन हे दोघे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मामुर्डी येथील एका बांधकाम कंपनीजवळ आले असता त्यांचा पती करीमशा शेख तेथे आला. त्यावेळी त्याने पत्नी अबिदा यांच्याशी भांडण केले. शेख याने अबिदा यांना कोयता व दगडाने जबर दुखापत केली. यात अबिदा गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर करीमशा तेथून पळून गेला. मुलगा आयन याने व तेथे जवळच काम करणाºया काही नागरिकांनी जखमी अबिदा यांना देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अबिदा यांचा मृत्यू झाला. 
दरम्यान, मुलगा आयन याच्या फियार्दीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: Shocking! murder of wife by stone stroke and weapon, Incident at Mamurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.