Shocking! जेवणाच्या वादातून पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 20:48 IST2020-07-18T20:44:34+5:302020-07-18T20:48:32+5:30
मृत चंद्रकला हीचा मृतदेह शवच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

Shocking! जेवणाच्या वादातून पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून केली हत्या
उल्हासनगर : शहरातील गायकवाड पाड्यात राहणाऱ्या सचिन गोंडाणे याने जेवणाच्या वादातून शुक्रवारी सायंकाळी पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील गायकवाड पाड्यात सचिन गोंडाने पत्नी व दोन लहान मुलासह राहत होता. शुक्रवारी दुपारी जेवणाच्या वादातून पती -पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागात असलेल्या सचिन याने सायंकाळी पत्नी चंद्रकला हिला मारहाण करून ओडणीने घरातील खांबाला बांधले. नंतर डोक्यात दगडी पाटा मारला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकला हीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सचिनचा भाऊ घरी आल्याने, सर्व प्रकार उघड झाला. शिवाजीनगर पोलिसांनी घटनस्थळी येवून पंचनामा केला. तसेच सचिन याला अटक केली. मृत चंद्रकला हीचा मृतदेह शवच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पती - पत्नीच्या भांडणात दोन लहान मुले अनाथ झाली आहे. कोरोना महामारी व सततच्या लॉकडाऊनच्या परिणामामुळे चंद्रकला हीचा बळी गेल्याची हळहळ परिसरात व्यक्त होत आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'
मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला