Shocking ...! a minor girl gang raped for the second time in five months | धक्कादायक...! अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांत दुसऱ्यांदा सामुहिक बलात्कार
धक्कादायक...! अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांत दुसऱ्यांदा सामुहिक बलात्कार

पालवाल : हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार करण्यावरून वाद सुरू असताना दिल्लीच्या शेजारच्या राज्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. 


हैदराबादनंतर बिहारच्या बक्सर आणि समस्तीपूरमध्ये बलात्कारानंत पिडीतेला जाळण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. तर शुक्रवारी दरभंगामध्ये एका टेम्पो चालकाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. देशभरातून अशा घटना समोर येत असताना आज पहाटे उन्नावमध्ये वर्षभरापूर्वी बलात्कार झालेल्या पिडीतेचा मृत्यू झाला. गुरुवारी ती न्यायालयात जात असताना जामीनावर सुटलेल्या आरोपीने तिला दांड्याने मारहाण करत अंगावर रॉकेल टाकत पेटवून दिले होते. तिला काल दिल्लीला हलविण्यात आले होते. 


पिडीतेच्या पालकांनी य़ा बलात्काऱ्यांना ठार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देशातील जनतेचीही हीच भावना आहे. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरला देशभरातून पाठिंबा मिळाला आहे. विविध स्तरातून स्वागत होत आहे. तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालल्याने अशा घटना घडत असल्याची टीकाही होत आहे. 


याला दुजोरा देणारी घटना आज हरियाणामध्ये घडली आहे. पालवालमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर 5 डिसेंबरला दुसऱ्यांदा सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीवर गेल्या ऑगस्टमध्ये सामुहिक बलात्कार झाला होता. यानंतर पुन्हा तिला बलात्काराला सामोरे जावे लागल्याने कायद्याचा धाक राहिला नसल्याचे समोर येत आहे. 

या मुलीने ऑगस्टमध्ये चार जणांनी अपहरण करून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनीच पुन्हा अपहरण करत बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. पलवाल पोलिसांनुसार तिचे 4 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. तक्रारीनंतर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. 

Web Title: Shocking ...! a minor girl gang raped for the second time in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.