शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मतिमंद मुलीने ३३ वर्षीय तरुणीला उचलून इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरुन खाली फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 12:29 IST

Crime News : सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देममता मोहन डोंगरे (वय ३३) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ममता ही गेली २० वर्षे या संस्थेत उपचार घेत आहे.

पुणे : ऑटिसिझम (आत्ममग्न)ची शिकार असलेल्या १४ वर्षाच्या मुलीने ३३ वर्षाच्या तरुणीला उचलून इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कोथरुडमधील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान या संस्थेत शुक्रवारी दुपारी पावणेपाच वाजता घडला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

ममता मोहन डोंगरे (वय ३३) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ममता ही गेली २० वर्षे या संस्थेत उपचार घेत आहे. तर १४ वर्षाची मुलगी ही मुळची मुंबईची असून गेल्या १ महिन्यापासून तिला संस्थेत भरती करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रोडवरील डावी भुसारी कॉलनीमध्ये सावली संस्था १९९४ पासून मतिमंद व बहुविकलांग मुलांवर उपचार करण्यात येतो. सध्या संस्थेत १७ रुग्ण आहेत. या तीन मजली इमारतीत मतिमंद व बहुविकलांग मुलांना वर खाली येता यावे यासाठी जिन्यात पायर्‍यांऐवजी रॅम्प करण्यात आले आहेत. जेणे करुन ते धरुन चालू शकतील. 

ममता ही ३३ वर्षाची असली तरी शरीराने अतिशय बारीक होती.तर आरोपी मुलगी १४ वर्षाची असली तरी ती शरिराने मजबूत आहे. ती अचानक हिंसक होते. संस्थेत असलेल्या बहुतेक मुलांना ऐकायला व बोलायला येत नाही. शुक्रवारी दुपारी ममता दुसर्‍या मजल्यावरुन पडून जखमी झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असताना तिचा मृत्यू झाला. याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली. 

पोलिसांनी तिचे शवविच्छेदन केल्यावर त्यात उंचावरुन पडून मृत्युचे कारण देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ममता ही दुसर्‍या मजल्यावर असणार्‍या जिन्यातील रॅम्पवर चालत असताना याच संस्थेतील दुसरी १४ वर्षाच्या मुलीने ममता हिला पाठीमागून पकडून तिला उचलून दुसर्‍या मजल्यावरील जिन्यातून खाली फेकून दिल्याचे त्यात दिसून आले. कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे