लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 08:29 IST2026-05-08T08:29:19+5:302026-05-08T08:29:19+5:30

या घटनेची भीती अद्यापही तिच्या मनात कायम होती. अखेर तिने धाडस करून या कृत्याबाबत वाचा फोडण्याचे ठरवले.

Shocking incident in Lonavala! Child molestation by biological father, case registered after one and a half years | लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल

लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल

पुणे - पर्यटननगरी लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना समोर आली असून ही घटना ऑगस्ट २०२४ मध्ये घडली होती.

याप्रकरणी आता तब्बल दीड वर्षानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपी पित्याने दारूच्या नशेत आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. सध्या तिचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, मात्र या घटनेची भीती अद्यापही तिच्या मनात कायम होती. अखेर तिने धाडस करून या कृत्याबाबत वाचा फोडण्याचे ठरवले.

पीडितेने सुरुवातीला ३ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकरणाची फिर्याद दिली होती. मात्र, घटनेचे ठिकाण लोणावळा असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून, लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : लोनावला: पिता ने बेटी पर किया घिनौना कृत्य; देरी से मामला दर्ज

Web Summary : लोनावला में चौंकाने वाली घटना: एक पिता ने कथित तौर पर अगस्त 2024 में शराब के नशे में अपनी नाबालिग बेटी के साथ दुर्व्यवहार किया। डेढ़ साल बाद मामला दर्ज किया गया। पीड़िता, जो अब 18 साल की है, ने 2026 में अपराध की सूचना दी, जिसके बाद पुलिस जांच शुरू हुई।

Web Title : Lonavala: Father's Heinous Act Against Daughter; Case Filed After Delay

Web Summary : A shocking incident in Lonavala: a father allegedly abused his minor daughter under the influence of alcohol in August 2024. The case was filed after a year and a half. The victim, now 18, reported the crime in 2026, leading to a police investigation.