'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:06 IST2026-05-08T10:06:27+5:302026-05-08T10:06:47+5:30

'उरी' या सिनेमातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री रिवा अरोरा हिच्यासोबत संतापजनक घटना घडली आहे. ऑनलाइन मागवलेल्या वस्तू घरी पोहोचवण्यासाछी आलेल्या ब्लिकिंट डिलिव्हरी बॉयसोबत अभिनेत्रीचा वाद झाला.

delivery boy misbehaved with uri fame actress riva arora shared experience | 'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."

'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."

'उरी' या सिनेमातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री रिवा अरोरा हिच्यासोबत संतापजनक घटना घडली आहे. ऑनलाइन मागवलेल्या वस्तू घरी पोहोचवण्यासाछी आलेल्या ब्लिकिंट डिलिव्हरी बॉयसोबत अभिनेत्रीचा वाद झाला. त्यानंतर त्या डिलिव्हरी बॉयने रिवा अरोराला शिव्याही दिल्या. प्रकरण इतकं तापलं की रिवाच्या कुटुंबीयांना पोलिसांना बोलवावं लागलं. 

नेमकं काय घडलं? 

रिवाने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत २६ एप्रिल रोजी तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, "दुपारी ३.३० वाजता तो डिलिव्हरी बॉय घरी सामान देण्यासाठी आला होता. पण सुरुवातीपासूनच तो उद्धट बोलत होता. माझ्या आईने शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आणखीनच उद्धटपणे उत्तरं देत होता. जेव्हा तो निघण्यासाठी लिफ्टमध्ये गेला तेव्हा माझ्या बहिणीने त्याला थांबायला सांगितलं. पण, तेव्हाही त्याने शिवीगाळ केली. त्या क्षणी वाटलं की हे जास्तच होत आहे. त्याची वागणूकच विचित्र होती. आम्ही त्याच्याशी शांतपणे बोलत होतो पण तो अपमानकारक, आणि वाईट भाषा वापरत होता". 

तब्बल ३०-४० मिनिटे हा संपूर्ण प्रकार सुरू होता. त्यानंतर रिवा अरोरा आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस येईपर्यंत त्या डिलिव्हरी बॉयला त्यांनी पकडून ठेवलं होतं. मुंबई पोलिसांनी तात्काळ प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी पोहोचत मदत केल्याचंही रिवा अरोराने सांगितलं. याप्रकरणी ब्लिंकीट अॅपविरोधात तक्रार दाखल केल्याचं रिवाने सांगितलं आहे. 

Web Title : 'उरी' फेम रीवा अरोड़ा के साथ डिलीवरी बॉय का दुर्व्यवहार, पुलिस बुलाई।

Web Summary : 'उरी' फेम रीवा अरोड़ा को ब्लिंकिट के एक डिलीवरी बॉय ने परेशान किया और गाली दी। विवाद बढ़ने पर रीवा के परिवार ने पुलिस को बुलाया क्योंकि डिलीवरी बॉय का व्यवहार असभ्य था और उसने गाली गलौज की। ब्लिंकिट के खिलाफ शिकायत दर्ज की गई है।

Web Title : 'Uri' actress Riva Arora harassed by delivery boy, police called.

Web Summary : 'Uri' fame Riva Arora faced misbehavior and verbal abuse from a Blinkit delivery boy. An argument escalated, prompting Riva's family to call the police due to the delivery boy's rude behavior and abusive language. A complaint has been filed against Blinkit.