Shocking Hypnotherapy | धक्कादायक! गुप्तांग कापून तरुणाला बनवले तृतीयपंथी 
धक्कादायक! गुप्तांग कापून तरुणाला बनवले तृतीयपंथी 

ठळक मुद्दे तरुणाला मिळणाऱ्या जास्त मोबदल्यामुळे तृतियपंथीय मित्रांनी त्याला बेदम मारहाण करत त्याचा गुप्तांग कापले आहे. तृतियपंथियाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून थाना हाथरस पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

शाहजहापूर - उत्तर प्रदेशमधील शाहजहापूर येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. तृतियपंथियांसोबत मैत्री करणं वीस वर्षीय तरुणाला खूपच महागात पडली आहे. तरुण वेगवेगळ्या सोहळ्यात जाऊन नाच करत असे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र, तरुणाला मिळणाऱ्या जास्त मोबदल्यामुळे तृतियपंथीय मित्रांनी त्याला बेदम मारहाण करत त्याचा गुप्तांग कापले आहे. तरुणावर अलिगढ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी थाना हाथरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित तरुण बेरोजगार होता व पोट भरण्यासाठी विविध सोहळ्यांमध्ये जाऊन नाचायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर तो कुटुंबाची खळगी भरायचा. दरम्यान फरूखाबाद येथे त्याची ओळख काही तृतियपंथियांबरोबर झाली. ते ही सोहळ्यात व इतर कार्यक्रमात नाचत. त्यामुळे तृतियपंथियांनी त्याच्यासोबत मैत्री केली. अनेक कार्यक्रमांना तो त्यांच्या सोबतही जाऊन त्यांच्याबरोबर नाचायचा. हे पाहून लोकं खुश होऊन त्याला जास्त पैसे द्यायचे. हे काही तृतियपंथीयांना रुचले नाही आणि याच वादातून काही दिवसांपूर्वी ते अचानक त्याच्या घरी गेले व त्याला गाडीत टाकून फरूखाबाद येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी त्याला बेदम मारहाण केली व त्याचे गुप्तांग कापले. दहा दिवस त्यांनी त्याला एका खोलीत डांबून ठेवले. नंतर संधी साधून पीडित तरुणाने तिथून पळ काढला. त्यानंतर तो  रुग्णालयात पोहचला. दरम्यान याप्रकरणी तरुणाने तृतियपंथियाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून थाना हाथरस पोलीस अधिक चौकशी करत आहेत.


Web Title: Shocking Hypnotherapy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.