धक्कादायक! कळव्यात कारच्या धडकेने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 20:54 IST2018-12-05T20:54:15+5:302018-12-05T20:54:55+5:30

खारेगाव नाका जीपी पारसिक बँकेसमोर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. खारीगाव पोलीस चौकीच्यामागे काही पारधी समाजाचे प्लास्टिक आणि फायबरचे सामान विक्रेते तळ ठोकून वास्तव्याला आहेत. त्यांच्यातीलच चार ते पाच मुले याच भागातील उद्यानामध्ये दुपारी खेळत होती.

Shocking The death of a three-year-old tinker with a tinkling of a car | धक्कादायक! कळव्यात कारच्या धडकेने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

धक्कादायक! कळव्यात कारच्या धडकेने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

ठाणे - कळव्यातील खारेगाव भागात बहात्तरसिंग लखन भोसले या तीन वर्षीय मुलाला भरघाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

खारेगाव नाका जीपी पारसिक बँकेसमोर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. खारीगाव पोलीस चौकीच्यामागे काही पारधी समाजाचे प्लास्टिक आणि फायबरचे सामान विक्रेते तळ ठोकून वास्तव्याला आहेत. त्यांच्यातीलच चार ते पाच मुले याच भागातील उद्यानामध्ये दुपारी खेळत होती. त्यांच्यापैकी बहात्तरसिंग हा रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला एका अज्ञात कारने उडविल्याची माहिती त्याच्या सोबत खेळणाऱ्या मुलांनी त्यांच्या पालकांना दिली. अपघात झाल्यानंतर तातडीने या मुलाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारापूर्वीच त्याचा  मृत्यू  झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या मुलाला शरीरावर कुठेही जखम नव्हती. मात्र, जबर मार लागल्यामुळे पोटात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू  झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी रोडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking The death of a three-year-old tinker with a tinkling of a car