धक्कादायक! भाजपाच्या नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपखाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 18:03 IST2020-05-16T18:02:03+5:302020-05-16T18:03:39+5:30
कमरुल हक चौधरी यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. असामाजिक कृत्य पाहता ही कारवाई केली गेली आहे.

धक्कादायक! भाजपाच्या नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपखाली अटक
आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना आसामच्या हजोई जिल्ह्यातील आहे. एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा नेत्यावर आहे.
कमरुल हक चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी नेता हा हाजोई जिल्ह्यातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष आहे. आसामच्या मध्यवर्ती जिल्ह्यात भा. दं. वि. कलम ३७६, ५११ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजोई जिल्ह्यातील एएसपी सुमन चक्रवर्ती यांनी सांगितले की, लंका पोलिस ठाण्यातील एका महिलेने नेत्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. ११ मे रोजी दिलेल्या तक्रारीत त्यांनी असा आरोप केला आहे की, भाजपा नेत्याने तिच्या घरात बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. एएसपी म्हणाले की, ''आरोपीने महिलेला अश्लील स्पर्श केला आहे. यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
हाजोई जिल्ह्यातील शंकर देव नगर येथील स्थानिक न्यायालयात शुक्रवारी पोलिसांनी आरोपी नेत्याला हजर केले. कोर्टाने त्याला बहादूरच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. दुसरीकडे ही घटना उघडकीस आल्यानंतर आसाम भाजपाने आरोपी नेत्याला पक्षातून काढून टाकले. आसाम भाजपाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कमरुल हक चौधरी यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. असामाजिक कृत्य पाहता ही कारवाई केली गेली आहे. अशी माहिती आज तकच्या न्यूज पोर्टलवर देण्यात आली आहे.
Coronavirus : बापरे! कोरोनाग्रस्ताची अंत्ययात्रा महागात पडली, गुन्हा दाखल; 13 जण निघाले पॉझिटिव्ह
coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा सहावा बळी
Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला
Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड
भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा