Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:48 PM2020-05-15T17:48:47+5:302020-05-15T17:53:25+5:30

Coronavirus : १० ते १५ जणांच्या टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात चार पोलिस कर्मचाऱ्यांसह उपपोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. 

Coronavirus: Lockdown Violators Attack on Police in antop hill pda | Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्ल्यात पोलिसांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे या पोलिसांना ताबडतोब गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई - लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अँटॉप हिल येथील गरीब नवाज परिसरात चार पोलिसांनी हटकले. म्हणून लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमींमध्ये दोन एसआरपीएफ जवानांचा समावेश आहे. मुंबईत काल रात्री अँटॉप हिल परिसरात गर्दी करू नका, आपापल्या घरी जा असं सांगत गस्तीवर असलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० ते १५ जणांच्या टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात चार पोलिस कर्मचाऱ्यांसह उपपोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. 


काल रात्री अँटॉप हिल येथे हा प्रकार घडला. लॉकडाऊन सुरू असतानाही काही लोक बिनकामाचे घराबाहेर बसले होते आणि काही लोक फिरत होते. त्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या बिनकामाचं हिंडणाऱ्या लोकांना हटकले आणि घरी जाण्यास सांगितले. तसेच एकाने तोंडाला मास्क लावलेला नसल्याने पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली असता घरातील लोकही बाहेर आले. पोलिसांनी त्यांना सुद्धा घरात जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे पर्यावसन हल्ल्यात झाले आणि एका व्यक्तीने पोलिसांवर अचानक हल्ला केला. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता ५ ते ७ महिला आणि १० ते १२ पुरुषांनी धारदार शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे या पोलिसांना ताबडतोब गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दोन जवानांचाही समावेश आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.
 

दुर्दैवी! शेतातून घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली, १३ जणांचा मृत्यू 

 

Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

 

'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं

 

Coronavirus : पोलीस कोठडीतील चार आरोपींना कोरोनाची लागण

Web Title: Coronavirus: Lockdown Violators Attack on Police in antop hill pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.