Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:58 PM2020-05-15T15:58:53+5:302020-05-15T16:03:08+5:30

Coronavirus : शास्त्रीनगर आणि हाऊसिंग बोर्ड परिसरात उठाबशा काढायला भाग पाडून संपूर्ण परिसरात फिरवण्यात आले होते. 

Coronavirus : The corona infected accused's rally in ambernath pda | Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड

Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड

Next
ठळक मुद्दे ज्या आरोपींना शास्त्रीनगर भागात फिरविण्यात आले तेच आरोपी कोरोनाग्रस्त आढळल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संबंधित आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

अंबरनाथ - अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलिस कोठडीत असलेल्या चार आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी उघड झाले होते. याच आरोपींची एक दिवस आधी ते राहात असलेल्या परिसरात पोलिसांनी धिंड काढली होती. त्यांना शास्त्रीनगर आणि हाऊसिंग बोर्ड परिसरात उठाबशा काढायला भाग पाडून संपूर्ण परिसरात फिरवण्यात आले होते. 

 

ज्या आरोपींना शास्त्रीनगर भागात फिरविण्यात आले तेच आरोपी कोरोनाग्रस्त आढळल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथ पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्याच्या आरोपावरून आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा दिवसांपूर्वी शास्त्रीनगर परिसरात दोन गटात जबर हाणामारी झाली होती. त्यात काही जणांना गंभीर दुखापत देखील झाली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संबंधित आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून न्यायालयात देखील हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. 

Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

 

ब्रिटन हायकोर्टाचा मल्ल्याला जबरदस्त दणका; संधी संपली, २८ दिवसांत भारतात येण्याची शक्यता

या आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने एक दिवस आधी म्हणजे बुधवारी या आरोपींची ते रहात असलेल्या परिसरात भर वस्तीतून उठाबशा काढण्याची शिक्षा देत त्यांची धिंड काढण्यात आली होती. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत कोणतेही गुन्हेगारी व्यक्ती पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार नाही ही भीती निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपींची धिंड काढली होती. मात्र हेच आरोपी गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुसरीकडे ज्या परिसरात या आरोपींना फिरविण्यात आले होते तो परिसर देखील चिंतेत आला आहे.

Web Title: Coronavirus : The corona infected accused's rally in ambernath pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.