अमृतसर: शिवसेना नेत्यावर दिवसा ढवळ्या झाडली गोळी, मंदिराबाहेर सुरू होते धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:32 IST2022-11-04T16:26:37+5:302022-11-04T16:32:40+5:30
दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी केली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासूनच सुधरी सूरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली जात होती, असे समजते.

अमृतसर: शिवसेना नेत्यावर दिवसा ढवळ्या झाडली गोळी, मंदिराबाहेर सुरू होते धरणे आंदोलन
अमृतसर येथे शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर शुक्रवारी दिवसा ढवळ्या गोळी झाडल्याची घटना घडली आहे. गोपाल मंदिराबाहेर कचऱ्यात देवांचीच्या मूर्ती सापडल्याच्या विरोधात शिवसेना नेते सुरी हे मंदिराबाहेर धरणे आंदोलन करत होते. याच वेळी गर्दीतून कोणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी केली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासूनच सुधरी सूरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली जात होती, असे समजते. पोलिसांनीही गेल्या महिन्यातच काही गँगस्टर्सना अटक केली होती. यानंतर करण्यात आलेल्या चौकशीतच आरोपींनी याचा खुलासा केला होता.
पंजाबमध्ये, एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी गेल्या महिन्यात 23 ऑक्टोबरला केलेल्या संयुक्त कारवाईत 4 गँगस्टर्सना अटक केली होती. अटक करण्यात आलेले गँगस्टर्स हे रिंदा आणि लिंडा टोळीतील होते. त्यांच्या चौकशीतून खळबळजनक खुलासे झाले आहेत. अटक करण्यात आलेले गुंड शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याचा कट रचत होते. यासाठी त्यांनी रेकीही केली होती. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलीस आणि एसटीएफने चौघांना पकडले. सुरी यांच्यावर दिवाळीपूर्वीच हल्ला करण्याचा कट होता, अशी कबुलीही आरोपींनी दिली होती.