शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मजुराजवळ आढळली धारदार शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:20 IST

पाचपावली पोलिसांनी एका मजूर युवकाला अटक केली.त्याच्या जवळ तलवार, चाकूसह आठ धारदार शस्त्रे आढळली.

ठळक मुद्देगुन्हेगारांच्या इशाऱ्यावर काम : पाचपावली पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पाचपावली पोलिसांनी एक मजूर युवकाला धारदार शस्त्रासह अटक केली आहे. जीशान अली ऊर्फ डिडा शब्बीर अली (२०) रा. टेका मोठी मस्जिदजवळ असे आरोपीचे नाव आहे. जीशान डेकोरेशनचे काम करतो. पाचपावली पोलिसांच्या त्याच्याजवळ शस्त्र असल्याची माहिती मिळाली. जीशान मंगळवारी सायंकाळी पोत्यात शस्त्र ठेऊन घरून जात होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला पकडण्यात आले. त्याच्या जवळ तलवार, चाकूसह आठ धारदार शस्त्र आढळले. चौकशीत त्याने कुख्यात गुन्हेगार फिरोज ऊर्फ टेन याने १५ दिवसापूर्वी शस्त्र दिल्याचे सांगितले. जीशानने दिलेल्या माहितीनुसार फिरोजशी त्याची मैत्री आहे. फिरोजने त्याला हे शस्त्र काही दिवसापूर्वी घरात ठेवण्यासाठी दिले होते. फिरोजच्या सांगण्यानुसार हे शस्त्र देण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले. जीशानच्या सूचनेवरुन पोलिसांनी त्वरित फिरोजच्या घरी धाड टाकली. परंतु तो आधीच फरार झाला. फिरोज कुख्यात आरोपी आहे. त्याने मोठी योजना घडवून आणण्यासाठी शस्त्र जीशानला सोपविल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आपल्या घरी कधीही धाड टाकू शकतात हे फिरोजला माहीत होते. जीशान फिरोजसाठी काम करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. फिरोज हाती लागल्यानंतर खरी स्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी जीशानविरुद्ध शस्त्र विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई निरीक्षक किशोर नगराळे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. सुरोशे, हवालदार विजय यादव, राजेश देशमुख, रविशंकर मिश्रा, विनोद गायकवाड, विजय जाने, सुनील वानखेडे, निलीमा सिंगाडे यांनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक