शारदा घोटाळा : मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने जेलमधून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By पूनम अपराज | Published: December 6, 2020 08:10 PM2020-12-06T20:10:11+5:302020-12-06T20:11:01+5:30

Sharda Scam : २०१३च्या घोटाळ्याच्या खटल्याचा सामना करत सेन याने आपल्या पत्रात सीबीआय आणि राज्य पोलिसांकडून त्याच्याकडून पैसे घेणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आवाहन केले.

Sharda scam: The main accused Sudipta Sen wrote a letter to the Prime Minister and Chief Minister from jail | शारदा घोटाळा : मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने जेलमधून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

शारदा घोटाळा : मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने जेलमधून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देप्रक्रियेचा एक भाग म्हणून एडीजी (सुधार गृह) पीयूष पांडे यांना हे पत्र सादर करण्यात आले आहे, असे जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हजारो कोटींच्या शारदा  घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. सेन याने पत्रात काही प्रमुख राजकारण्यांसह अनेक प्रभावशाली व्यक्तींनी त्याच्याकडून आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप केला. २०१३च्या घोटाळ्याच्या खटल्याचा सामना करत सेन याने आपल्या पत्रात सीबीआय आणि राज्य पोलिसांकडून त्याच्याकडून पैसे घेणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी विनंती करणारी याचिका सेन याने १ डिसेंबर रोजी केली होती. सेन याने पत्रात म्हटले आहे की, 'आदरणीय सर आणि आदरणीय मॅडम, मी शारदा कंपनी समूहाचे मालक आणि संचालक सुदिप्ता सेन, मला सांगायचे आहे की, बऱ्याच प्रभावशाली लोकांनी माझ्याकडून आर्थिक लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या यादीमध्ये माकप, भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या अनेक राजकारण्यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मी सीबीआय आणि राज्य पोलिसांना विनंती करतो.

सध्या येथे राष्ट्रपतींच्या सुधारगृहात बंदिस्त असलेले सेन यांनी पत्रात म्हटले आहे की,यापूर्वी त्यांनी सीबीआय आणि पश्चिम बंगाल पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली होती, परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मी सीबीआयला याबद्दल सर्व काही सांगितले आहे. उच्च नैतिकतेबद्दल बोलणाऱ्यांनी गरीब लोकांची खरोखरच फसवणूक केली हे पाहून मला खूप वेदना होत आहे. मी सीबीआय आणि राज्य पोलिसांना या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची विनंती करतो.

प्रक्रियेचा एक भाग म्हणून एडीजी (सुधार गृह) पीयूष पांडे यांना हे पत्र सादर करण्यात आले आहे, असे जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पांडे यांनी मात्र याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे माकपचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी सेन याच्या आरोपांना कचरा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसनेही पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या राज्य नेतृत्वानेही संपूर्ण प्रकरण 'गलिच्छ राजकारण' असे घोषित केले, परंतु सीबीआय या प्रकरणातील सत्यता समोर आणेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Sharda scam: The main accused Sudipta Sen wrote a letter to the Prime Minister and Chief Minister from jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.