लाजिरवाणे! विधवा वहिनीला बंदुकीचा धाक दाखवून दिराने लुटली अब्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 21:28 IST2022-03-21T21:24:07+5:302022-03-21T21:28:40+5:30

Sexual Abuse Case : पीडितेच्या म्हणण्यानुसार, सासरच्यांनीही आरोपीला सहकार्य केले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Shame on you! brother in law did raped on widow sister in law | लाजिरवाणे! विधवा वहिनीला बंदुकीचा धाक दाखवून दिराने लुटली अब्रू

लाजिरवाणे! विधवा वहिनीला बंदुकीचा धाक दाखवून दिराने लुटली अब्रू

आग्रा - कोतवाली परिसरातील एका गावात राहणाऱ्या एका विधवा महिलेवर बंदुकीच्या धाकावर दिराने बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, सासरच्यांनीही आरोपीला सहकार्य केले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दोन वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झाला
कोतवाली परिसरातील एका गावात राहणाऱ्या महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. 28 नोव्हेंबर रोजी विधवा महिला घरात झोपली होती, तेव्हा रात्री उशिरा दीर घरी आला आणि आवश्यक काम असल्याचं सांगून दरवाजा उघडला. दीर आत येताच तिच्या छातीवर पिस्तूल लावून तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने बंदुकीच्या जोरावर विधवेवर बलात्कार केला. आवाज ऐकून त्यांची मुले जागी झाली असता आरोपीने तेथून पळ काढला.
 

सासूनेही आरोपीची बाजू घेतली
या घटनेनंतर पीडितेने सासूला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर सासूनेही आरोपीची बाजू घेत सुनेस गप्प राहण्यास सांगितले. यानंतर पीडित महिला तक्रार घेऊन कोतवाली येथे पोहोचली, मात्र तेथेही तिचे कोणी ऐकले नाही. त्यानंतर पीडित महिलेने न्यायासाठी कोर्टाचा आसरा घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी दीर व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

संतापजनक! मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे काढले, त्यानंतर मृतदेह नग्नावस्थेत...

अशी घटना येथेही घडली
आग्राच्या मालपुरा पोलीस स्टेशन परिसरात 14 मार्च 2022 रोजीही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये महिलेला घरात एकटी पाहून नात्यातील भावाने बलात्कार केला होता. घरातील इतर सदस्य घरी आले असता महिला अस्थावस्त अवस्थेत आढळून आली. ती इतकी घाबरली होती की तिला नीट बोलताही येत नव्हते. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत.

 

Web Title: Shame on you! brother in law did raped on widow sister in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.