अश्लील फोटो दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 08:59 PM2020-08-12T20:59:15+5:302020-08-12T20:59:47+5:30

वकिलासह दोघांवर गुन्हा; पीडित महिलेची तक्रार

Sexual harassment of a married woman by threatening to show pornographic photos | अश्लील फोटो दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार

अश्लील फोटो दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देमहिलेने पोलिसांत तक्रार देणार असे सांगितले तेव्हा तुझीच बदनामी होईल, असे अशी भीती पीडित महिलेला दाखवली.

सातारा - मानसिक त्रास दूर करण्याच्या बहाण्याने तसेच अश्लील फोटो दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका वकिलासह दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

फादर प्रमोद सदानंद लोंढे रा. करंजे, सातारा आणि ॲड मंगेश चंद्रकांत पाटील रा. दौलतनगर, सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संबंधित पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावात शेतावरून वादविवाद होत असल्यामुळे सातारा येथे राहण्यास होती. ५ जुलै २००७ रोजी मैत्रिणीच्या दुकानात संबंधित पीडित महिला बसली होती. त्यावेळी दुकानात प्रमोद सदानंद लोंढे रा.करंजे व मंगेश चंद्रकांत पाटील (कुर्लेकर) रा. नुने ता. जि. सातारा हे दोघे आले. मैत्रिणीने लोंढे यांना महिलेच्या मानसिक त्रासबाबत सांगितले. त्यावर लोंढे यांनी प्रार्थना सभेत येण्यास सांगितले. त्याप्रमाणे पीडित महिला मैत्रिणीसमवेत ७ जुलै २००७ रोजी मल्हार पेठ, सातारा येथील एका कार्यालयात गेली. तेथे लोंढे याने महिलेच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. तेव्हा तिला चक्कर आली. त्यानंतर दोन महिन्यांनी लोंढे महिलेच्या घरी आले. तेथ महिलेच्या डोक्यावर हात ठेवुन प्रार्थना केली. त्यावेळीही महिलेला चक्कर आली. यानंतर २००८ मध्ये लोंढे याने प्रार्थना कार्यक्रमांस जाण्याच्या बहाण्याने तिला एस.टीने सांगली येथे नेले. कुपवाड येथे प्रार्थना संपल्यानंतर सांगली येथे यायला रात्रीचे आठ वाजले होते. त्यामुळे महिला सांगलीतील चुलत भावाकडे जात असताना तिला जावू न देता सांगली येथील एका लॉजवर घेवून गेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. 

 

दुसर्‍या दिवशी महिला सातारा येथे एकटीच एस.टी.ने आली. यानंतर २००९ मध्ये काही कामानिमित्त एम.आय.डि.सी सातारा येथे महिला गेली होती. यावेळी लोंढे तेथे आला व तेथील एका रूममध्ये नेवून पुन्हा महिलेवर अत्याचार केला. महिलेने पोलिसांत तक्रार देणार असे सांगितले तेव्हा तुझीच बदनामी होईल, असे अशी भीती पीडित महिलेला दाखवली. दरम्यान, २०१३ मध्ये महिलेच्या पतीला वाढेफाट्याजवळ चोरट्यांनी पोटात चाकूने वार करून पैसे लुटले होते. पती रुग्णालयात उपचार घेत असताना मंगेश पाटील याने मदतीच्या बहाण्याने महिलेच्या पतीशी मैत्री केली. त्यानंतर महिलेने त्यास लोंढे याच्या गैरकृत्यबद्दल सांगितले. मंगेश पाटील यांने लोंढे यांना धडा शिकवुया असे म्हणत गोड बोलुन महिलेला २०१६ मध्ये एका हॉटेलमध्ये नेवून थम्सअप मधुन गुंगीचे औषध देवून अत्याचार केला. या प्रकाराने खचून जावून महिलेने औषधाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी महिलेच्या मुलीने उपचार करून तिला घरी आणले. त्यानंतरही मंगेश पाटील यांने महिलेच्या घरी येवून गळ्याला चाकू लावुन सलाईन लावलेली असताना तिच्यावर अत्याचार केला. वारंवार हा प्रकार घडत असल्याने संबंधित पीडित महिलेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयीतांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

 

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

 

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

 

अलिशान कारमधून गोव्यातील कुख्यात गुंडाची मडगावात एन्ट्री

Web Title: Sexual harassment of a married woman by threatening to show pornographic photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.