शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

बापच करायचा लैंगिक अत्याचार, १८ वर्षीय मुलीची तक्रार; लहान बहिणीलाही सोडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 06:10 IST

याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती.

मुंबई : व्ही. पी. रोड पोलिसांनी शनिवारी एका ५२ वर्षीय व्यक्तीला पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. याप्रकरणी त्याच्या १८ वर्षीय मुलीने तक्रार केली आहे.

तक्रारदार मुलगी ही तिचे वडील, आई आणि छोट्या बहिणीसह गिरगावमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला अनाथालयात पाठविण्यात आले. तिला स्वत:च्या घरात सुरक्षित वाटत नव्हते, असे तिचे म्हणणे होते. याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती. दरम्यान मार्चमध्ये तिची आई अनाथालयात तिला भेटायला गेली, तेव्हा बाप छोट्या मुलीला नायगावच्या चाळीत नेऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याचे आईने सांगितले. यामुळे धक्का बसलेल्या मुलीने स्वत:वरची आपबीतीही सांगितली. 

बापाला चार दिवसांची कोठडी

याप्रकरणी सीडब्लूसीने तक्रार दाखल केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवत नराधम बापाला शनिवारी ताब्यात घेतले. मात्र गुन्हा प्रत्यक्ष गिरगावात घडल्यामुळे ते प्रकरण आता व्ही. पी. रोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. आरोपी बापाला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पिडीतेची आई आणि लहान बहीण घरातून निघून गेलेले असून, सीडब्लूसी अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.

जीवे मारण्याची धमकीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी २०११ मध्ये ५ वर्षांची असल्यापासून वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने या मुलीने कोणालाच हा प्रकार सांगितला नाही. २०१६ पर्यंत ती या मानसिक यातना सहन करत राहिली. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषण